मंगळवार, २८ एप्रिल, २०२०


         लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर निघाला तोडगा
पेट्रोल पंपावर पोलीस नियुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

जालना (प्रतिनिधी):- लाॅकडाऊन काळात प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावलीमुळे पेट्रोलपंप चालकांची मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वाहनधारकांना पास दिल्या जात असल्याने तसेच प्रशासन व पोलीस यांच्यात
योग्य समन्वय नसल्याने अनेक पेट्रोलपंप चालकांचा गोंधळ उडाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर अखेर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्याने पंपचालकांना दिलासा मिळेला आहे.लाॅक डाऊन काळात प्रशासनाने पेट्रोलपंप चालकांसाठी वेळोवेळी नियमावली जाहीर केली आहे. यात अत्यावश्यक सेवेत येणारी वाहने, पास दिलेली वाहने व शेतकरी यांना वेळोवेळी इंधन पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात पेट्रोल पंप सुरु ठेवण्याची वेळही प्रशासनाने ठरवून दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी कमी कामगारावर पेट्रोल पंपाचे कामकाज सुरु असुन इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाधारकांचे पास बघुन इंधन देणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी पोलीसांकडून नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील पेट्रोलपंप चालकांनी केल्या आहेत.हाच तक्रारींचा पाढा घेऊन पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रतिनिधी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे गेले होते. त्यांच्या सर्व समस्या त्यांनी या लोक प्रतिनिधींना सांगीतल्यानंतर अखेर पेट्रोल पंप चालक व प्रशासन यांच्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्ती करुन सुवर्ण मध्य काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.27) पंपावर पास तपासणीसाठी पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती विरेन पटेल यांनी दिली. त्यामुळे सत्यनारायण तोतला, बंडुभाऊ मिश्रीकोटकर, इंद्रसेठ तवरावाला, विरेन पटेल, दिलीप मोरे या शिष्टमंडळाच्या मागणीला अखेर यश आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...