मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

परतूर नगर परिषदेने शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करावी-प्रकाश सोळंके

परतूर /प्रतिनिधी-सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव जोमाने होत आहे.नागरिकांनी घरात बसावे, घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.तरी पण आवश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने शहरात नागरिकांना हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझर ची 
 उपलब्ध करून द्यावी याकरिता मनसे चे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी आज दि.२८ रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील आष्टी रेल्वे गेट,साईबाबा मंदिर चौक, पारडगाव रोड,आंबा रोड या रस्त्याने बाहेर गावची वाहने आणि लोक शहरात प्रवेश करतात.या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याचे नळ आणि सॅनिटायझर ची सोय करण्यात आली तर येणारे नागरिक हात धुवूनच शहरात प्रवेश करतील.त्यामुळे स्वच्छता राहून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येण्यास मदत होईल.तसेच महादेव मंदिर चौक,बाजार समिती मैदान (मोंढा) आणि इतर गर्दीच्या ठिकाणी अशी हात धुण्यासाठी सोय करण्यात यावी जेणे करून कोरोनाचा फैलाव होणार नाही.तरी,नगर पालिका प्रशासनाने तात्काळ परतूर शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी, सॅनिटायझर उपलब्ध करून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना कराव्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...