बुधवार, ८ एप्रिल, २०२०

           सिंधी काळेगाव येथील गाजीखान बाबा यात्रा रद्द.
सिंधी काळेगाव प्रतिनिधी:-जालना तालूक्यातील सिंधी काळेगाव येथील अनेक वर्षापासून चालत 
आलेला गाजिखान बाबा आणि सय्यद सहाब यांचा उरूसानिनित्त या ठिकानी मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. आज(गूरूवारी)   यात्रा उत्सव होती. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्शभूमीवर जिल्ह्यात संचार बंदी असल्याने हि यात्रा रद्द केली असल्याचे आयोजकांनी सांगीतले.आज सिंधी काळेगाव येथे गाजिखान बाबा आणि सय्यद सहाब यांचा उरूस मोठ्या उत्सवात दरवर्षी  साजरा करण्यात येतो. या ठिकाणी जेवढे काही कार्यक्रम असतील ते हिंन्दू मुस्लीम मिळून साजरे करत असतात. काम धंद्यासाठी बाहेर गावी गेलेले गावकरी ही या यात्रे निमीत्त गावात येत असतात.  त्यामुळे वर्षातून एक वेळेस सर्वाच्या भेटीगाठी घडत असल्याने सर्वजन आनंद व्यक्त करत करत होते.  परंतु या वर्षी कोरोना या विशाणूने पूर्ण जगभर हाहाकार माजवलेला आहे.   त्यामूळे अनेक तिर्थक्षेत्राच्या यात्रा रद्द केल्या गेल्या आहे. तसचे सर्वकडे संचार बंदी असल्याने सिंधी काळेगाव या ठिकानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याची सर्वांनी  नोंद घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहॆ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...