बुधवार, ८ एप्रिल, २०२०


    जालना येथील रमाईनगर शासनाच्या अनुदानापासून वंचित.
       अद्यापही कुठली मदत शासनाची व्यक्ती आमच्याकडे 
        आली नाही - रमाई नगर येथील नागरिकांचा आरोप
जालना प्रतिनिधी :- कोरोना ने जगात हाहाकार
माजल्यामुळे सर्वत्र सर्वत्र लॉक डाऊन आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे हातावरील मजूरराना मुश्कील झाले आहे. रमाई नगर येथील सर्व लोक हात मजूर असल्यामुळे त्यांचे अनेक तुमचा पासून काम बंद आहे. रोज काम केले तरच संध्याकाळी चूल शिलगेल, नाही तर उपाशीच झोपावं लागेल अशी परिस्थिती रामनगर राहणाऱ्या हात मजुरांची आहे. हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व नागरिक आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले आहेत. काम बंद आहे पैसा आणायचा कुठून असा प्रश्न या नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. महामारी मरण चालूच आहे पण जर अन्न आपल्याला नाही मिळालं तरी आपला मृत्यु होऊ शकतो असा अशी परिस्थिती रमाई नगरातील नागरिकांची झाले आहे. ना कुठली शासनाकडून मदत ना कुठल अनुदान किंवा कुठलीही शासनाची कर्मचारी रामाई नगरात आलेली नाही असा आरोप रमाई नगरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच रमाई नगर मध्ये जास्त लोकसंख्येची वस्ती आहे. रमाई नगर मधील समाजसेविका श्री.शालिनी शर्मा यांनी देखील लेखी अर्ज शासनाकडे सादर केला आहे. तरीही शासनाची अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही असा आरोप शालिनी शर्मा यांनी देखील केलेला आहे. रमाई नगर मधील सर्व कुटुंब मजुरी करणारे असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
 प्रशासनाने याकामी लक्ष घालून गरजू लोकांना आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रमाई नगर नागरिकांकडून होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...