गुरुवार, १६ एप्रिल, २०२०


शिधापत्रिकाधारकांसाठी नियमित व अतिरिक्त नियतन उपलब्ध
जालना,प्रतिनिधी:- कोरोना कोविड १९ विषाणूच्‍या प्रार्दुभावाच्‍या अनुषंगाने शासनाकडून लॉकडाऊन 
जा‍हीर करण्‍यात आलेला आहे. सदर पार्श्‍वभूमीवर जिल्‍हयातील शिधापत्रिकाधारकांना पुरेसे अन्‍नधान्‍य उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाकडून नियमित व अतिरिक्‍त नियतन उपलब्‍ध करून देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी दिली आहे.माहे एप्रिल २०२० करिता दिनांक १४ एप्रिल २०२० अखेर जिल्‍हयामध्‍ये  अंत्‍योदय अन्‍न योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना १३४२८ क्विंटल, प्राधान्‍य कुटूंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना ५३९५० क्विंटल, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना २९२५ क्विंटल धान्‍याचे वितरण करण्‍यात आलेले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजने अंतर्गत वितरण करावयाचा मोफत तांदूळ ७१३९ क्विंटल एकूण ८३ टक्‍के धान्‍य वितरण करण्‍यात आलेले आहे. हे नियतन शिधापत्रिकाधारकांसाठी वितरण करण्‍यात आलेले असून दिनांक २०.एप्रिल, २०२० पर्यंत १०० टक्‍के लाभार्थ्‍यांना सर्व योजनांचे धान्‍य वितरण करण्‍यात येणार आहे. धान्‍य वितरण सुरळीत होण्‍यासाठी तलाठी, ग्रामसेव‍क यांच्‍या तालूकास्‍तरावर  नियुक्‍त्‍या करण्‍यात आलेल्‍या आहेत. शिधापत्रिकाधारकांनी रास्‍तभाव दुकानास जावून त्‍यांचे धान्‍याची उचल करावी, असे श्रीमती रिना बसैय्ये यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...