गुरुवार, १६ एप्रिल, २०२०


      चंदनझिरा पोलीस ठाण्यात उभारला निर्जंतुकीकरण कक्ष
                        स्थानिक युवकांचा सहभाग.
               तर पो.कॉ.अनिल काळे यांचा पुढाकार
जालना प्रतिनिधी :- चंदनझीरा पोलीस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांच्या कल्पनेतून निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन 
उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.अतिशय कमी खर्चामध्ये व काही जुन्या वस्तूंचा वापर करून सदरील निर्जंतुकीकरण कक्ष पोलीस ठाण्याच्या प्रवेश दाराजवळ उभारण्यात आला. पो.कॉ. अनिल काळे यांनी निर्जंतुकीकरण कक्षासंबंधी पुढाकार घेतला तर चंदनझीरा येथील इलेक्ट्रिशियन चा व्यवसाय करणारे अमोल आवटे, शिवा दैने व गणेश शेळके या युवकांनी आपले पूर्ण योगदान देऊन निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यास परिश्रम घेतले.चंदनझीरा पोलीस स्टेशनच्या कक्षामध्ये २४ गावांचा समावेश असून जालना शहराचा मोठा भाग येतो. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस गस्तीवर रहावे लागते. सध्या संचार बंदीच्या काळात पोलिसांवर कामाचा व्याप फार मोठा वाढलेला आहे. व कोरोना  च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना असंख्य लोकांच्या सहवासामध्ये आल्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनाही कोराना ची बाधा झाल्याचे वृत्त येत आहे.त्यामुळे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, उपअधीक्षक समाधान पवार व चंदनझीरा  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोलले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम राबवण्यात आला निर्जंतुकीकरण पक्षाच्या बाजूने नियमांचे पालन करणे संबंधी सूचनांचे बॅनर लावण्यात आले.पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून चंदनझीरा येथील नागरीकांच्या वतीने अमोल आवटे, शिवा दैने व गणेश शेळके या युवकांचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...