गुरुवार, १६ एप्रिल, २०२०


     गरजु व्यक्तींना अन्नधान्य,जेवण व मदत वाटपाचे छायाचित्र                       समाजमाध्यमांवर प्रसारित करु नयेत
जालना,प्रतिनिधी:- देशभरात लॉकडाऊन झाल्यापासुन अनेक दानशुर व्यक्ती पुढे येवुन अनेक गरजुंना मदत करीत आहेत. मात्र ही  मदत करतांना अनेकांनी त्यांचे फोटो, व्हिडिओ, चित्रीकरण करुन सोशल मिडीयावर टाकले आहेत.
  यामुळे गरीब, गरजु व्यक्तींची अवहेलना होत असल्याची निदर्शनास आले आहे. यामुळे अशा व्यक्तींच्या स्वाभिमानास ठेच पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.अन्नधान्य, जेवणाचे वाटप करतांना गर्दी होते त्यामुळे सामाजिक अंतर पाळले जात नसलयाने लॉकडाऊनचा मुख्य हेतु साध्य होत नाही.सर्व जिल्हावासियांना सूचित करण्यात येते की, कुणीही गरजु व्यक्तींना अन्नधान्य, जेवण व तत्सम मदत साहित्य देताना फोटो, व्हिडीओ, चित्रीकरण करुन सामाजिक माध्यमावर पाठवू नये. तसेच अशा गोरगरीब, गरजु व्यक्तींच्या स्वाभिमानास ठेच पोचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अशा प्रकारे गरजू व्यक्तींना अन्नधान्य, जेवण व तत्सम मदत साहित्य देताना फोटो, व्हिडीओ, चित्रीकरण करुन सामाजिक माध्यमावर टाकल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधात्म्क कायदा 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकार रवींद्र बिनवडे यांनी एका परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...