शनिवार, २५ एप्रिल, २०२०


             अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे 
                    मोफत द्या – बाबासाहेब कोलते

स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी


जालना,(प्रतिनिधी):- कोरोना व्हायरस चा फटका हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जास्तीचा बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी 
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे मोफत देण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसचा फटका सर्वानाच बसत असला तरी ग्रामीण भागातील अल्पभूधारक व मोठ्या शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे, त्यामध्ये ग्रामीण भागातील काही शेतकरी कष्टकरी कुटुंब हातावर पोट भरून जगणारे आहेत. कोविड-१९ या महामारी विरोधात लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे परंतु गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची यंत्रणा ठप्प झाली आहे.आज रोजी काही शेतकऱ्यांकडे कापूस, मका, तूर हरभरा गहू घरामध्ये पडलेला आहे, लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाला शेतकऱ्यांच्या मनासारखा भाव मिळत नाही त्यामुळे आता जून जुले मध्ये खरीपाची पेरणी सुरु होणार आहे आगामी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी कशी करावी हा बिकट प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर पडला आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मजुरांना काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे मजुरांमार्फत करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह मजुरांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी गावागावात प्रशासनाने रोजगार हमीची कामे सुरु करावी शेतकऱ्यांचा शेतीमाल हा लॉकडाऊन मुळे घरातच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून व शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणेसाठी महाराष्ट्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना व अन्य शेती धारकांना शेतकऱ्यांना शासनाने मोफत खते व बियाणे कृषी कार्यालयाकडून वाटप करावे व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...