शनिवार, २५ एप्रिल, २०२०

नांदेडमध्ये 'कोरोना व्हायरस' आला कोठून ? पहिल्या रुग्णाच्या 'सोर्स'चा शोध लागेना

आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले,पोलिसी पद्धतीने होणार तपास

नांदेड (भगवान कांबळे):- नांदेडमध्ये सापडलेल्या पहिल्या  कोरोनाच्या  रुग्णाला  हा  संसर्ग  नेमका  कुठून  झाला  याचा  शोध 72  तासानंतरही  लागला  नाही. परिणामी  आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले  आहे.नांदेडमध्ये  बुधवारी  पीरबुरहाननगर भागात एक 64 वर्षीय  व्यक्तीला  कोरोना झाल्याचे उघड़ झाले.  ही  बाब  समजताच महीनाभरापासून 
कोरोनाची  तटबंदी  करणाऱ्या  प्रशासनाला मोठा  धक्का  बसला. पीरबुरहाननगर परिसराला  कन्टेनमेंट झोन  म्हणून  घोषीत केल्यानंतर  पोलीस व  आरोग्य  विभागाने 3 किमी चा  परिसर आपल्या  ताब्यात  घेतला. कोरोना रुग्णाचे  जवळपास 14 कुटुंबीय आणि  संपर्कातील इतर 30 ते 35 जणांना विलगीकरण केले. त्यांचे  स्वॅबही  घेण्यात  आले. व 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 38 नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह ही आला आहे . सदर रुग्णाला  कोरोनाची  लागण  नेमकी  कुठून  झाली  हा प्रश्न  मात्र  अद्यापही  अनुत्तरीतच आहे. कोरोना बाधित व्यक्ति हा  दोन महिन्यांपासून घरातच असल्याचे सांगत आहेत. सदर रुग्णावर  2 खाजगी रुग्णालयात 8 दिवसांपूर्वी उपचार करण्यात  आले  होते. ते  दोन्ही  रुग्णालय  सील  करण्यात आले आहेत. त्या  रुग्णालयाच्या  डॉक्टरलाही क्वारंटाइन केले आहे. एकूणच नांदेडच्या त्या  पहिल्या कोरोना  रुग्णाला लागण नेमकी  कुठून  झाली  याचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनीही आता पोलिसी पद्धतीने माहिती  घेतली जाईल  असे ते स्पष्ट  केले आहे  .शहरातील  इतर भागात कोरोना पसरु नये यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत असल्याचेही  स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील भाग्यनगर भागही सील करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...