मंगळवार, १९ मे, २०२०

खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातून अवैध पाणी उपसा थांबेना लॉकडाऊनमध्ये पुंडलिक हरिश्‍चंद्रे यांचे औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयसमोर 27 मे पासून उपोषण.


जालना/प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातून शेतीसाठी सुरू असलेला अवैध पाणी उपसा थांबवावा, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादसमोर 27 मे पासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता पुंडलिक विश्‍वनाथ हरिश्‍चंद्रे यांनी दिला आहे.याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद व जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. यावर गावातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा, यादृष्टीने नियोजन हवे. या धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी जालना, तहसिल कार्यालय अंबड, पाटबंधारे उपविभाग अंबड यांना वेळोवेळी निवेदन दिले होते. उपोषण केली. मात्र, कारवाई केली जात नव्हती. ’पिण्यासाठी धरणातील पाणीसाठा राखीव ठेवण्याची आवश्यकता असताना दिवसरात्र विद्युत मोटारी वारेमाप पाणी उपसा करीत आहे. अशीच पाणी चोरी सुरू राहिली तर हे पाणी 15 दिवसात संपण्याची शक्यता आहे. सध्या कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. धरणात अत्यल्प जलसाठा आहे. पाटबंधारे विभागाने वेळोवेळी गांभीर्याने कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा गावासह इतर गावांना भीषण पाणीटंचाईला समोरा जावे लागणार आहे,’ असे निवेदनात म्हटले आहे.पाणी चोरी रोखण्यात अपयश खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातून पाणी चोरी रोखण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्याने पाणीचोरी रोखली जाणार नाही, तर त्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणीही हरिश्‍चंद्रे यांनी केली आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...