शनिवार, १६ मे, २०२०

जिल्हा परिषद गट निहाय किंवा पंचायत समिती गण निहाय क्वारंटाईन सेंटर चालू करा- प्रतिभा इंद्रजित घनवट




परतूर / प्रतिनिधी    प्रशांत वाकळे

     सध्याची कोरोनाची भीषण परस्तीती पाहता होम क्वारंटाईन केलेले गाभिर्य  पाळत नसून यामुळे याचा प्रादुरभाव वाढायला काहीच वेळ लागणार नाही, यांचे गाभिर्य  लक्षात घेत प्रशाषणाने तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय किंवा पंचायत समिती गण निहाय क्वारंटाईन सेंटर चालू  करण्याची मागणी जिल्हा परिषद सातोना गटाचे सदस्य प्रतिभा इंद्रजित घनवट यांनी निवेदनाद्वारे केली आहे उपविभागीय अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आले की, तालुक्यात एकूण 84 ग्रामपंचायती असून तीन ते चार ग्रामपंचायतीला एक ग्रामसेवक आहे. चार ते पाच गावासाठी एक तलाठी असून दोन ते तीन गावासाठी आरोग्य कर्मचारी आहे यासाठी आरोग्य कर्मचारी आणि तलाठी व ग्रामसेवक यांना प्रत्येक गावात जाऊन बाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेणे अत्यत जिकरीचे झाले आहे. याठिकाणी काही महिला कर्मचारी असून त्यांना चार - चार पाच - पाच गावासाठी काम करणे अत्यंत जिकरीचे होत आहे, या कर्मचाऱ्यांना बाहेरुन आलेली व क्वारंटाईन केलेली लोक दात देत नसून, घरात न राहता ही लोक सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत, यांना रोखण्याचा प्रयत्न केला गावातील सरपंच व इतर कोरोना रक्षक हे गावात काम करत असताना गावातील आलेल्या काही  आडमुठी पणाच्या लोकांमुळे गावात छोटे - मोठे वाद होत आहेत तरी तालुक्याचे नाही परंतु जिल्हा परिषद गट निहाय किंवा पंचायत समिती गण निहाय विलगीकरण सेंटर करून आलेल्या लोकांना गावाच्या बाहेर दुसर्या  गावात ठेवल्यास हे लोक चांगल्या परीने राहतील व खऱ्या अर्थाने सोशल डीस्टन्सिंग पाळल्या जाईल या करिता वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे . गाव वाचले तरच देश वाचेल आपल्याकडे आरोग्य व्यवस्था पाहिजे तशी नसून जर ग्रामीण भागात कोरोना वायरस चा प्रादुर्भाव झाल्यास गावची गाव वस पडतील अशी चिंता त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.  वेळेतच वरील प्रमाणे उपाययोजना केल्यास गावाच्या व नागरिकांच्या हिताचे राहील अशी रास्त मागणी शेवटी त्यांनी निवेदनात केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...