शनिवार, १६ मे, २०२०

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लोणी सावंगी उच्च पातळी बंधाऱ्यात सीआर मधून पाणी सोडा -आमदार बबनराव लोणीकर



परतूर प्रतिनिधी/ इम्रान कुरेशी
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लोणी सावंगी उच्च पातळी बंधाऱ्यात सीआर मधून पाणी सोडण्याबाबतचे निवेदन जलसंपदामंञी जंयत पाटील यांना आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील परतूर व बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहिले असून उन्हाच्या वाढत्या पातळीमुळे विहिरींनी तळ गाठला आहे अशा परिस्थितीत लोणी सावंगी उच्च पातळी बंधारा खाली येणारी परतूर तालुक्यातील लोणी, कनकवाडी, गोळेगाव, कुंभारवाडी, चांगतपुरी, संकनपुरी, पिंपळी धामणगाव, सावरगाव, कुंभारवाडी, लांडगदरा यासह माजलगाव तालुक्यातील नाथ्रा, सादोळा, जवळा, आदी गावांमध्ये सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी सावंगी बंधाऱ्यात पाणी सोडण्यास जनावरांना पिण्याचे पाणी यासह परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. सद्यस्थितीत सदरील गावकऱ्यांना कोरोना संकटाच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून येत्या काळात पाणी न सोडल्यास या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सदरील गावांना पाणी मिळावे म्हणून लोणी सावंगी या उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी सोडणे गरजेचे आहे, बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व तात्काळ पाणी सोडण्याबाबत चे आदेश देण्यात यावेत असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य देवेन्द्रजी फडणवीस विरोधीपक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी, जालना यांना दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...