शनिवार, १६ मे, २०२०

 सन 2017 18 च्या खरेदी-विक्री संघाच्‍या खरेदी घोटाळा ची फाईल पुन्हा उघडली

पो नि सोहन माछरे मुख्य सूत्रधारा पर्यंत पोहोचतील का ?

तालुक्यातील 33 शेतकऱ्यांनी वजनात वाढ केली म्हणून पोलिसांच्या चौकशीसाठी नोटिसा

बसव ब्रिगेड शेतकर्‍यांच्‍या पाठिशी




*धर्माबाद (भगवान कांबळे ):- सन 2017 18 मध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्याला व मराठवाड्यामध्ये गाजलेला धर्माबाद चा हरभरा तूर  खरेदी घोटाळा पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी तपासासाठी समोर घेतलाय घेतलाय शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाला विकलेल्या मालाच्या पावती मध्ये खाडाखोड करून वजन वाढवून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केल्याचा आरोप खरेदी-विक्री संघाच्या सचिव यांणि पोलीस ठाणे मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहेया प्रकरणांमध्ये अनेक खरेदि विक्र संघाच्या तात्कालीन कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले होते व कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद च्या गोदाम पालावर सुद्धा गुन्हा नोंद झाला होता सदरील प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांच्याकडे होता येथून बदली झाल्यामुळे सदरील प्रकरणाचा तपास विघमान  सोहन माछर यांच्याकडे आला असल्यामुळे याप्रकरणातील सत्यता जाणून घेण्यासाठी गुन्हा नंबर 48 /2020 कलम 420,468 ,408, 34 भारतीय दंडविधान मधील फिर्यादी शाम राजाराम संगेवार  धमाऀबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक करत आहेत .फिर्यादीने आपल्या फिर्यादी मध्ये नमूद केल्याप्रमाणे सन 2017 18 साला करिता विदर्भ कोऑपरेशन मार्केटिंग फेडरेशन नागपूर यांचे सभेचे एजंट म्हणून खरेदी विक्री संघ धर्माबाद संस्थेमार्फत महाराष्ट्र सरकारने हमी भावाने खरेदी केलेल्या तूर व हरभरा खरेदी यांचा सभी एजंट म्हणून खरेदी विक्री संघातर्फे हा तत्कालीन व्यवहार करण्यात आला होता या व्यवहारांमध्ये खरेदी-विक्री संघाने नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पावत्या मध्ये खाडाखोड करून वजनात वाढ केल्याची तक्रार त्यावेळी दाखल करण्यात आली असल्यामुळे तात्कालीन कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली होती.कधी विक्री खरेदी विक्री संघ धर्माबाद येथे विक्री केलेल्या तूर आणी हरभऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या वजनात काही क्विंटलची वजनाची वाढ केल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात शासनाच्या हमी भावाप्रमाणे खरेदी केलेले पैसे जमा झाले असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे

तर संबंधित शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता _---__-------------------------------सदरील प्रकरण आपल्याला काहीच माहीत नसून माझ्या शेतात घामाने कष्टाने पिकविलेल्या  माल मी खरेदी-विक्री संघाच्या मार्फत विक्री केला असून त्यामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही किंवा कुठल्या पावती आमच्या हातात नव्हत्या आम्हाला 
आम्ही विक्री केलेल्या मालाचे पैसे मिळाले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
-----+----++++++++++
नोटिसा दिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आज धावत धर्माबाद ते पोलिस स्टेशन गाठले 
-------------------------पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी चौकशी केल्यानंतर सत्यता पडताळून पाहू आणि कुठल्याही निरापराध शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होणार नाही याची शाश्वती उपस्थित शेतकऱ्यांना दिली

या प्रकरणाचा निष्पक्ष पणे निष्पक्षपाती पणे मी तपास करीत असून दोषी आढळणाऱ्या ला कोणाचीही गय केली जाणार नाही मग तो शासनाचा प्रतिनिधी असेल खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी असेल किंवा कोणी शेतकरी असेल त्यावर योग्य तपास करून गुन्हा दाखल होईल कायद्यासमोर कुणी लहान-मोठा नाही असे प्रतिपादन श्री सोहन मात्रे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला केले
-----------+-------------
लाॅकडाऊच्या काळामध्ये आपल्या शेतीच्या कामासाठी व्यस्त असणारा आधीच आर्थिक विवंचनेने मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा तपासासाठी पोलिस अधिकाऱ्याने बोलल्यामुळे एकच धांदल उडाली होती परंतु सदरील काही शेतकऱ्यांनी बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान यांना हे प्रकरण निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील गाडीवाण यांणि पोलिस स्टेशन गाठून सदरील शेतकऱ्यांची बाजू पोलिस निरीक्षकास समोर मांडली असता पोलीस निरीक्षकांनी निरापराध शेतकऱ्यांना कुणालाही या प्रकरणात गोवण्यात येणार नाही फक्त त्यांना एक तपासाचा भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देऊन बोलावण्यात आलेले आहे अन्याय कुणावर होणार नाही अशी शाश्वती दिली असता शेतकऱ्याचे समाधान झाले

यानंतर बसव ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की ---------------
तत्कालीन घोटाळ्याची व्याप्ती पाहता येणाऱ्या मालाची तूट भरून काढण्यासाठी खरेदी-विक्री संघाच्या मार्फत ही फिर्याद दिली गेली असून निरापराध शेतकऱ्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला तर तो सामान्य शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून खपवून घेतला जाणार नाही
 आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्मचाऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा जर मिळत असेल तर हा प्रकार निंदनीय असून या प्रकरणाचा पूर्णतः छडा लावल्याशिवाय बसव ब्रिगेड स्वस्थ बसणार नाही 
शेतकर्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असेही जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान यांनी आपले मत व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...