शुक्रवार, २२ मे, २०२०

      सामना कोरोनाशी जनजागृती अभियान


घनसावंगी (प्रतिनिधी) :- घनसावंगी तालुक्यातील १४ गावामध्ये क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था दरेगाव आणि महिला आर्थिक उन्नती मंडळ (मायुम) यांच्या वतीने सामना कोरोणाशी या उपक्रमाची सुरुवात माहेर जवळा येथून सामाजिक अंतर ठेऊन करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ, उषाताई शिंदे, सुधाकर भोसले,राजेंद्र बोडखे, गंगाराम भोसले,विष्णु भोसले, कल्याण वरखडे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सेनीटायझर, हॅण्डवाश आणि  मास्कचा नियमित वापर करावा. मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या लोकांची माहिती शासनाला कळवावी, अफवांवर विश्वास ठेवू नये,पोलीस, डॉक्टर आशा वर्कर,यांना सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांनी केले.तसेच मायुमच्या उषाताई शिंदे यांनी महिलांना निर्माण होणाऱ्या आजाराविषयी माहिती दिली.तसेच सर्वांनी पोस्टिक आहार देऊन आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.बाहेर गावातून येणाऱ्या ची काळजी घेऊन त्यांच्या मुलाबाळांना सहकार्य करा.अशी माहिती दिली.
या उपक्रम अंतर्गत प्रत्येक गावात  ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि संस्थेच्या वतीने आरोग्य दुताची निवड करण्यात आली असून त्यांच्या सहकार्याने गावातील गरीब लोकांना मास्क, सेनीटायझर, हॅण्डवाश वाटप करून त्यांना कोरोना विषयी माहिती पत्रकानी मार्गदर्शन  करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...