शुक्रवार, ५ जून, २०२०


             हजारो वंचितांचा तो झाला आधार  सरकारी पाठपुरवठा करून गावोगावी पाठविले मजूर.




औरंगाबाद,ब्युरोचीफ :- लॉकडाऊनच्या काळात राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या हजारो मजुरांना मदत करून त्यांना त्यांच्या गावी पाठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यकर्त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. औरंगाबाद येथे राहणारा अनिल इंगळे हा कार्यकर्ता हजारो मजुरांचा आधार झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज पर्यंत या कार्यकर्त्यांने बुलढाण्यातील मौजे जनुना, पोस्ट गुम्मी या ठिकाणी राहणारा आणि औरंगाबाद मधुन वंचित बहुजन आघाडीचे काम करणारा अनिल इंगळे लॉकडाऊनच्या काळात पक्षातर्फे गरीब मजुरांना मदत करावी, या हेतूने कामाला लागला. मात्र लोकांना काय मदत करावी, हा प्रश्न त्याच्यापुढे होता. ग्रामीण भागात राहून धान्य,मास्क याचे वाटप परिस्थिती अभावी करता येणे शक्य नव्हते. म्हणून त्याने इतर राज्यातून महाराष्ट्रात आणि  महाराष्ट्रातून इतर राज्यात जाण्यासाठी लागणाऱ्या ई पासचे (परवाना पत्र) काम हाती घेतले. सर्वप्रथम त्याने राज्यभर आपले फोन नंबर शेअर करून ज्यांना आपल्या गावी जायचे आहे, अश्या लोकांनी आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही तासातच त्याच्याकडे लोकांचे कागदपत्रे व्हाट्सअपवर येऊ लागले. आलेली माहिती घेऊन अनिलने त्यांचे फॉर्म भरण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे अडीच महिन्यात सुमारे ३ हजार लोकांचे फॉर्म त्याने भरले आणि त्यांना ई पास मिळवून दिले. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले, अशा लोकांसाठी त्याने संबंधीत  जिल्यांच्या विभागाला मेल करून त्याची माहिती घेऊन हे फॉर्म परत नव्याने भरून त्यांना ई पास मिळवून दिले. अनिल मुळे हजारो मजूर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात,दिल्ली या राज्यातील आपल्या घरी सुखरूप पोहचले असून त्यांनी फोन करून अनिलचे आभार मानले आहे. तर इतर राज्यातूनही हजारो मजूर महाराष्ट्रात अनिलमुळे परत आले आहेत. संकट काळात हजारो वंचितांच्या मदतीला धावणारा हा वंचित खऱ्या अर्थाने लोकांचा आधार झाला. वंचित बहुजन आघाडीकडून त्याच्या कार्याला सलाम, आपणही त्याच्या कार्याचे कौतुक करू शकता, तसेच ई पास साठी ८२०८८२१०४४, ९७३०६२८०२८, ८४८५०३२११ या क्रमांकावर आपण संपर्क साधून मदत घेऊ शकता. वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती दिली.
आपले काम चालूच ठेवले असून घरी परतलेल्या अनेक मजुरांनी फोन करून त्याचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...