शुक्रवार, ५ जून, २०२०

*उदगीर खरीप हंगामासाठी 6 हजार 880 टन खत उपलब्ध*
 *क्रूषी विभाग*: सोयाबीन  बियाणांची उगवण क्षमता  तपासावी,
*उदगीर*: ता 4 (जिवन भोसले )
मान्सुनपुर्व  पावसामुळे शेतकर्यांना  दिलासा  मिळाला आहे,  त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत आहेत दरम्यानं , बाजारपेठेतील क्रुषी सेवा केंद्रा वर शेतकर्यांची  रिघ लागल्याचे  दिसुन येत आहे , उदगीर तालुक्या साठी 6 हजार 880 टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे . तालूक्यातील शेतकरी खरिपाची  तयारी करित आहेत दरम्यान, मानसुनपुर्व पाऊस झाल्याने शेतकरी  हंगाप पुर्व काम आटोपत आहेत.बाजारपेठेत थ्री -बियाणे, खतांची , चैकशी करत आसल्याचे पाहण्यास मिळत आहे . ऊदगीर तालुक्यातील 7 हजार 600 टन रासायनिक  खताची  मागनी  नोंदविन्यात आली होती,  त्या पैकी  7 हजार 483 टन ऊपलब्ध करुन देण्यास शासनाणे मान्यता  दिली आहे,या पैकी  आतापर्यंत  6 हजार  880 टन खत साठा  उपलब्ध  झाला आहे,. सध्या  तालुक्यातील खताचा पुरेसा  साठा आहे. यंदा खरिपाच्या  कालावधीत लाँकडाऊन असले तरी  खतांचा  तुटवडा जानवनार ऩाही
दरम्यान सोयाबिन बियाणांची  मुबलक उपलब्धता काही दिवसात होनार आहे. तत्पुर्वी  पेरनी करावी लागली तर शेतकर्यांणी  स्वत: कडील ब्यानाचा वापर करावा   मात्र  त्या पुर्वी त्याची   उगवन क्षमता  तपासुन पहावी , दरम्यान  गावा गावा मधुन क्रुषी  विभागाच्या वतिने बियाणे उगवनीसंदर्भात  प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे .
 खते व बियाणांची क्रत्रिम   टंचाई  निर्माण करुन जादा दराणे  विक्री करणार्यावर  क्रूषी विभागाचे लक्ष आहे  तक्रार आल्या स कारवाई केली जाईल असे  पंचायत समितीचे अधिकारी  यशपाल सातपूते यांनी सांगीतले.
 यंदाच्या  खरिप बियाणे व खतांचा तुटवडा  जानावनार नाही . महाबिजकडे 7 हजार 96 क्वींटल  सोयाबिनच्या बियाणांची मागणी  करण्यात आली आहे . बियाणांची उगवन क्षमता तपासुन घ्यावी  असे  आवाहन  पंचायत समीतीचे  क्रुषी  अधिकारी  यशपाल सातपुते यांनी  सांगीतले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...