शुक्रवार, ५ जून, २०२०

नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या आदेशाने मे. भारत क्लास स्टोअर्स दुकान सील.




अंबड/प्रतिनिधी : अंबड शहरातील मे. भारत क्लास स्टोअर्स यांना मा .जिल्हाधिकारी जालना यांनी त्यांच्या प्रतिबंधक आदेश दिनांक 31 /5/2020 हे सर्व दुकाने व व्यापारी अस्थापना यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.असा व्यवसाय करताना लॉक डाऊन मध्ये  टप्याटप्याने बाबाचा मार्गदर्शन सूचना मार्गदर्शन सूचना निर्गमित केले आहेत covid-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहेत आणि या सूचनांमध्ये दुकानदाराने ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर सुरक्षित करावे आणि दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाही याची दक्षता घ्यावी असे नमूद केले आहे कामाचे ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे वारंवार संपर्काची साधने जसे की हँडल्स कॅश काऊंटर इत्यादी सतत  सॅनिटाइझ करणे आणि सर्व कर्मचारी ग्राहक यांनी थर्मल स्कॅनिंग करणे या बाबी सुचित केले आहेत कार्यालयात आयोजित बैठकीत या माध्यमातून याबाबत सर्व संबंधितांना पूर्ण कल्पना दिली गेली आहे म्हणून एकंदरीत covid-19 प्रभाव रोखण्यासाठी दुकानदार व्यवसायिक अस्थापना यांनी उपरोक्त सर्व दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते माननीय तहसीलदार अंबड यांना अहवाल दिनांक 2/6 /2020 व पंचनामा दि 1/6/2020 होणार हे स्पष्ट होते की मे.भारत क्लॉथ स्टोअर अंबड या व्यवसायिक स्थापना मध्ये covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियम व मार्गदर्शक सूचना यांची कोणतेही पालन होत नाही तसेच मोठ्या प्रमाणात जमाव जमवून सामाजिक अंतर मास्क घालणे , स्वच्छता पाळणे इत्यादी नियमाचे पालन होत नसल्याने स्पष्ट होते तसेच अतिशय धोकादायक पद्धतीने ग्राहक कर्मचारी मालक व्यवस्थापक हे एकमेकांना  खेटून,स्पर्श करून आपले व्यवहार करत होते त्यामुळे  अंबड शहर व परिसरातील  covid-19 प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करून आपल्या व्यवसायिक फायद्यासाठी समाजाचे स्वास्थ्य धोक्यात आल्याचे आहे व याला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आवश्यक असल्याने माझे मत झाले तर खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत मे.भारत  स्टोअर्स अंबड या व्यावसायिक स्थापनेत या आदेशाच्या दिनांकापासून व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात येत आहे पुढे असेही आदेशित करण्यात येत आहे की मे. भारत क्लॉथ स्टोअर्स अंबड यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंबून करण्यासाठी त्यांचा सखोल आराखडा सादर केल्यानंतर व असा आराखडा पालन करण्याबाबत खात्री झाल्यानंतर त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल व भविष्यात पुन्हा असे उल्लंघन आढळून आल्यास नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यातबाबत दुकाने व आस्थापना परवाना नगर परिषद अंबड यांना सूचित  करण्यात येईल असे निश्चित केली आहे मा.उपविभागीय अधिकारी अंबड श्री .शशिकांत हादगळ यांच्या आदेशाने नायब तहसीलदार दांडगे साहेब मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर साहेब, तलाठी सतीश  देशपांडे पोलीस कॉन्स्टेबल डोईफोडे यांनी पंचनामा करून मे. भारत क्लास स्टोअर्स अंबड या दुकानाला दि .३/६/२०२० रोजी सायंकाळी सील लावून बंद केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...