बुधवार, २५ मार्च, २०२०

          जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही
कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक                          उपाययोजना नागरिकांची काळजी घ्यावी
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
जालना, प्रतिनिधी :- कोरोनो विषाणुचा
प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 59 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. त्याीपैकी 57 रुग्णां चे स्वॅब घेण्याजत येऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याभपैकी 42 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन 12 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.  आतापर्यंत 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असुन त्यांना घरीच अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. 
दि. 25 मार्च रोजी एकुण 15 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. राज्यातुन व इतर राज्यातुन आलेल्या 212 नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करुन लक्षणे असणाऱ्यांवर उपचार करुन स्वत:च्या घरात अलगीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन जिल्ह्यात कोरोना विषाणुचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.
औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वरुडी या ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले असुन या पोस्टच्या माध्यमातुन 24 तास येणाऱ्या वाहनांवर नजर ठेऊन तपासणी करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात एकुण 15 संस्थांची अलगीकरणासाठी निवड करण्यात आली असुन त्या ठिकाणी 1 हजार 539 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 49 शीघ्र प्रतिसाद पथके, 208 आरोग्य पथके व शहरी भागातही आरोग्य पथके स्थापन करण्यात आली असुन या पथकांमार्फत देशातुन, बाधित भागातुन आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  ज्यांना तीव्र लक्षणे दिसुन येतात अशा रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात येत आहे.
 घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असुन आरोग्य पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत. जनतेने काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.वैयक्तिक स्वच्छता राखावी.  कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच नजिकच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...