बुधवार, २५ मार्च, २०२०

जीवनावश्यक वस्तूची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना, प्रतिनिधी:-जिल्ह्यातील बरेचसे 
जीवनावश्यक वस्तूचे व किराणा मालाची दुकाने बंद असलेबाबत व जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करत असलेबाबत (विशेषतः भाजीपाला, कांदे , बटाटे) याबाबत तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी  आपले जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे दुकान तात्काळ उघडे ठेवावेत व गरजू ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दराने पुरवठा करण्यात यावा. कोणीही जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व कांदे बटाटे जादा दराने विक्री करू नये. अन्यथा सदर व्यापाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधीत व्यापारी,दुकानदार , व्यक्ती व संस्था यांच्याविरुद्ध  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे घाऊक व किरकोळ दुकाने चालू/ उघडी आहेत का? याची खात्री करावी तसेच कोणतीही जीवनावश्यक वस्तू अथवा भाजीपाला, कांदे, बटाटा यांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...