उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला यशस्वी तपास
नांदेड(भगवान कांबळे) :- उमरी तालुक्यातल्या मौ.शिरुर येथे दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी ८५ वर्षीय वयोवृध्द महिला किशनबाई पुंडलीक पडोळे यांची दुपारी ०२-०० वाजल्याचे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे डोक्यात लाकडी धीपली मारून गंभीर जख्मी करून निर्घृण खुन केल्याची व गळ्यातील सोन्याची पोत व कानातील मुद्या काढून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटने संदर्भात मयत वृध्द महिलेचा नातु साईनाथ गंगाधर पडोळे रा.शिरुर ता.उमरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून उमरी पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात दि.२६ फेब्रुवारी २०२० रोजी गुरक्र.३९/२०२० कलम ३०२,३९४ भादपी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या वृध्द महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात उमरी पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सदरील गुन्ह्याचा तपास जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला.या गभीर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा तपास विविध पध्दतींचा अवलंब करून तसेच तांत्रिक पुरावे हस्तगत करून दि.०६ में २०२० रोजी आरोपी शिवाजी रावसाहेब पडोळे वय ३० वर्षे रा.शिरुर ता.उमरी यास अटक केली सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली यावेळी तपासा दरम्यान आरोपीने मयत वृध्द महिलेच्या अंगावरील काढून घेतलेले गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याच्या मुद्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पुढील तपास चालु असल्याचे सभामजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा