शनिवार, ९ मे, २०२०

हातभट्टीची दुचाकीवरुन वाहतूक

बीड :  गेवराई तालुक्यातील जातेगाव रोडवर एका दुचाकीवरुन हातभट्टीची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडील 60 लिटर हातभट्टी व दुचाकी जप्त करत दोघांवरही गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
गावठी दारु

      कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध घालण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुद्यप्त्या जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अशावेळी अवैध मद्य निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम राबविली आहे. आठ मे शनिवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बीड श्री शेख यांनी त्यांचे पथकासह गेवराई शहराच्या हद्दीत असलेले गेवराई-जातेगाव रोडवर संतोष अंकुश पवार (वय 32) व विकास साहेबराव राठोड वय 23 वर्षे दोन्ही राहणार कोल्हेर रोड गेवराई हे त्यांच्या दुचाकीवर प्लास्टिकचे कॅन वाहतूक करताना दिसून आले. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने त्यांना थांबवून त्यांच्याजवळील कॅनची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात 35 लिटर क्षमतेचे, 20 लिटर क्षमतेचे व 5 लिटर क्षमतेचे हातभट्टी दारूने भरलेले प्लास्टिक कॅन दिसून आले. ज्यात 60 लिटर हातभट्टी दारू अवैध विक्री करिता नेत असल्याचे आढळून आल्याने सदर दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड एम.ए शेख, जवान सांगुळे व वाहन चालक सुंदर्डे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...