गुरुवार, १४ मे, २०२०

 कोरोना तपासणी कॅबिन आत्ता परतूर मध्येही !

लायन्स क्लब आणि महालक्ष्मी पतसंस्थेच्या पुढाकाराकाराने ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध झाली कोरोना तपासणी कॅबिन




परतूर/प्रतिनिधी :- लायन्स क्लब आणि महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मॉडेल स्कुलमध्ये नियोजित कोरोना तपासणी केंद्राला, कोरोना तपासणी कॅबिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात गरज भासल्यास कोरोना संशयित रुग्णाचे नमुने घेण्याची सुविधा परतूर येथे सूरू करण्यात येणार आहे. या साठी आवश्यक असणाऱ्या कोरोना तपासणी कॅबिनची आवश्यकता असल्याने सामाजिक संघटनांनी पुढे येऊन ते उपलब्ध करुन द्यावेत असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर.नवल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लायन्स क्लब आणि महालक्ष्मी नागरी सहकारी पथसंस्थेने सदरील कोरोना तपासणी कॅबिन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. मंगळवारी या कॅबिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, लायन्स क्लबचे मनोहर खालापूरे, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम,डॉ.डी. आर.नवल,डॉ. जाहेद सय्यद, रामभाऊ काळे, परेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जात आहेत.त्याच्यात एक भाग म्हणून भविष्यात गरज भासल्यास रुग्णांची सोय होण्याच्या उद्देशाने शहारानजीक आंबा येथील मॉडेल स्कुलचे रूपांतर विलगीकरण केंद्रात करण्यात आले आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहाचे रूपांतर आयसोलेशन सेंटर मध्ये करण्यात आले आहे. रुग्णाच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी यावेळी दिली.
कोरोना सारख्या जागतिक संकटात देश सापडला असतांना अनेक संस्था, संघटना आपल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करत आहेत. देश संकटात असतांना मदतीसाठी पुढे आलेले हातच देशाला या संकटातून बाहेर येण्याचे बळ देणार आहेत. या जाणिवेतून महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख रुपये जमा केले आहेत. शिवाय प्रत्येक शाखा स्तरावर सामाजिक उपक्रम राबविला जातो आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लायन्स क्लबच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक साधन सामुग्री भेट देण्यात आली असल्याचे एकनाथ कदम यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...