गुरुवार, १४ मे, २०२०



बॅटरीवर 35 कि. मी. चालणारी सायकल प्राध्यापक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी केली तयार



अंबड (प्रतिनिधी) :- वाहनांच्या वाढत्या संख्यामुळे होणार्‍या प्रदुशनावर मात करता यावा या उद्देशाने अंबड येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रविभागात कोर्स करणारे शिवप्रसाद वाघमारे, अभिषेक शिंदे, अश्‍विनी नागवे, गोविंद डाके या चार विद्यार्थ्यांनी संकल्पनेतून दहा हजार रूपये खर्च येत असलेलली बॅटरीवर चालणारी सायकल तयारी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात यंत्रविभागात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून बॅटरीवर 35 किलोमिटर पर्यंत धावणारी सायकल बनविली असून ही सायकल तयार करण्यासाठी साधारण 10 हजार रूपयापर्यंत खर्च आला असून या सायकलच्या फिटींगसाठी बॅटरी, हेडलाईट, हॉर्न, बॉक्स या पद्धतीचे साहित्या वापरून ही सायकल तयार करण्यात आली आहे. या सायकलवर रात्रीच्या वेळेला सुद्धा प्रवास करता येवू शकतो तसेच बॅटरी संपल्यानंतर पायडलवर सुद्धा ही सायकल चालवता येवू शकते असेही त्या विद्यार्थ्यांनी सांगीतले.
अशा सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने विविध योजनेमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवावे. शासनाकडून अशा विद्यार्थ्यांची दखल घेतल्यास भविष्यात विद्यार्थी वेगवेगळ्या कलातून तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकताता. बॅटरीवर चालणारी सायकल त्यांच्या प्रयोगाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेची ओळख निर्माण करून दिली आहे. या सायकलमुळे प्रदुषनाला आळा बसण्यास देखील मदत होते. जे गरीब विद्यार्थी महागडी गाडी घेवू शकत नाही त्यांच्यासाठी अशी सायकल फायदेशीर ठरू शकते.
सदरील विद्यार्थ्यांनी अंबड ते वडीगोद्री रस्त्यावर जाऊन परत येने असा एकुण 35 कि. मी. चा प्रवास या बॅटरीवर चालणार्‍या सायकलने केला. विद्यार्थ्याचे वडील तात्यासाहेब वाघमारे यांना सायकल संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, मुलांनी तयार केलेली बॅटरीवर चालणारी सायकल पाहुन मला मोठा आंनद झाला असून मी मुलाच्या पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करणार असून त्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...