सोमवार, १६ मार्च, २०२०

त्या मयत व्यक्तीचे कोरोना चाचणी 'निगेटिव्ह'*नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी - पालकमंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांचे आवाहन            
बुलडाणा (ब्यूरो चीफ):  सौदी अरेबिया येथून परतलेल्या
७१ वर्षीय वृद्घाला काल बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयीत म्हणून दखल करण्यात आले होते. दरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला होता. या वृद्ध व्यक्तीचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तरी आज या नमुण्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित यांनी दिली आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे या रुग्णाच्या बाबतीत सातत्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संपर्कात होते. त्यांनी रुग्णाच्या परिस्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चाही केली होती. याबाबत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, मयत व्यक्तीचा कोरोना अहवाल नकारात्मक आला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. कुणीही गर्दीच्या ठिकाणी जावू नये. गर्दीत न जाणे शक्य असल्यास टाळावे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. हात स्वच्छ धुऊन रुमाल वापरावा. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.चिखली येथील रुग्ण असल्यामुळे चिखली शहरासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
*

कोरोना मुळे शिरासमार्ग येथे शाळाबंद ,बाजार बंद रस्ते साम सुम
___________________________
कोरोणा विषाणू प्रसार नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
शिरसमार्ग प्रतिनिधी :-  कोरोना व्हायरास मुळे सर्वत्र
नागरिक भयभीत झाले आहेत.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत तर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग येथील ग्रामपचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये,आठवडी बाजार, जनावराचा बाजार,31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.शिरसमार्ग येथील जिल्हा परिषद शाळा
 ना सुट्या देण्यात आले आहे. व तसेच आठवडी बाजार, जनावराचा बाजार, व्यवहार ठप्प झाली आहे.रस्ते साम सुम झाले आहे.
शिरसमार्ग ग्रामपचायतने आजचा आठवडी बाजार बंद केला आहे.हा बाजार स्थळ ह्या ठिकाणी भरतो.ह्या बाजारात विविध ठिकणांहून व्य पारी मोठ्या प्रमाणात येतात.हा बाजार बाजूला खेडे पाडे,वड्या अासल्यामुळे येथे नागरिकांची व व्यापाऱ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्यप्रमाणे  आठवडी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी व तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. व त्यामळे आठवडी बाजार शिरसमार्ग येथे भरला नाही.

रविवार, १५ मार्च, २०२०

बहुजन समाज पार्टी जालणाच्या वतीने मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जालना प्रतिनिधी :- जालना शहरातील येथील बहुजन समाज
पक्षाच्या जालना जिल्हाच्या वतीने मान्यवर काशिराम साहेब यांची 86 वी जयंती फोटोला हार घातलून मस्तगड येथे साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हा पदाधिकारी उपस्थित जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे,जिल्हासचिव ज्ञानेश्वर गरबडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विवेक दहीवाळ,
जिल्हाबिव्हीएफ,रंजीत हिवाळे,संजय खरात,पेंटर खरात साहेब,आढावे बाबा,जाधव साहेब, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्याच्या अध्यक्षपदी महेंद्र बनकर तर सचिवपदी मनोहर उघडे यांची निवड.
जालना (प्रतिनिधी):- गेल्या 42 वर्षाची परंपरा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2020 च्या  अध्यक्षपदी रेल्वे कर्मचारी तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध 
निवड करण्यात आली तर सचिव पदी मनोहर उघड यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्राम गृह जालना येथे आयोजीत एका बैठकीत ही निवड कण्यात आली आहे.जालना शहरात गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरु आहे. या व्याख्यानमालेस नामवंत साहित्यिकांसह मान्यवरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाची मेजवाणी जालनेकर श्रोत्यांना व्याख्यान मालेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येत असते.त्यानुशंगाने दि. 15 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बी.एम. साळवे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर सेठ रत्नापारखे, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, एन.डी. गायकवाड, व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष अरुन मगरे, माजी सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. सदर बैठकीत माजी सचिव सुहास साळवे यांनी 2019 चा हिशोब सादर केला. मागील व्याख्यानमालेचा हिशोब सर्वानुमते मान्य करण्यात आला. यावेळी संजय हेरकर, अनुराधा हेरकर, फकीरा वाघ, महेंद्र रत्नपारखे,  विलास रत्नपारखे, कैलास बनसोडे, महेंद्र बनकर, सुनिलभाऊ साळवे, बबनराव रत्नपारखे, पप्पू चत्रे, सिध्दार्थ के. मोरे, रनजीत रत्नपारखे, सुनिल बनकर,  मनोहर उघडे, परमेश्वर उघडे, सुहास साळवे, जे.एस. कीर्तीशाही, विजय कांबळे, योगेश रत्नपारखे, सचिन कांबळे, अशोक रगडे,  शिवाजी सहारे, दिपक डोके, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, कपील खरात, सतिष वाहुळे, संदीप साबळे,  मिलींद बोर्डे, किशोर जाधव, राहुल वाहुळे, प्रकाश हिवाळे, प्रकाश मोरे, विलास भिंगारे, तेजराव खरात, सुधाकर मोरे, सुनिल साळवे, अमित साळवे, करण सदावर्ते, राहुल रत्नपारखे, प्रमोद म्हस्के, प्रमे जाधव, एस.एस. कांबळे, माधवराव पात्रे, मंगलदास बागुल, डी.आर. धामने, जयसेन बनकर, राहुल धिवार, अर्जुन जाधव, आत्माराम यादव, बाळु बोर्डे, सर्जेराव खरात, गौतम वाघमारे, नितीन गोदाम, संघदीप कुलतर्खे, सिमोन सुतार,  तेजराव मोरे, सुनिल रत्नपारखे, राजेंद्र जाधव, अशोक लबडे, मधुकर बोबडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
         जगदंबा इंग्लिश स्कूलमध्ये कोरोणाविषयी जनजागृती प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांनी कोरोणापासून बचाव ची केली तयारी.
विहामांडवा (प्रतिनिधी) मोहम्मद शेख :-:पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी
व शिक्षकांनी कोरोना वायरस पासून बचावासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता मुलांनी कोरणा विषयी माहिती देऊन कोरोना आजार टाळण्यासाठी प्रत्यक्षात केले जाणाऱ्या उपयोग उपाय योजनेचे प्रात्यक्षित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोना वायरस चे लक्षणे, डोकेदुखी, सर्दी व खोकला, श्वसनाचे त्रास, किडनी फेल, ताप व त्यापासून बचावासाठी साबण व पाण्याने स्वच्छ हात धुणे, शिंकताना रुमालाचा वापर करणे, सर्दी व खोकला झालेले व्यक्तीपासून दूर राहणे व तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरणे, त्याच प्रमाणे हस्तांदोलन टाळणे, रुमाला पासुन मास्क तयार करणे, एकमेकात सुरक्षित अंतर ठेवणे व जमिनीवर मातीत खेळल्यानंतर  साबणाने स्वच्छ धुणे या कोरोना पासून बचावाच्या गोष्टी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचप्रमाणे शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला व कोरोना नावाची मानवी साखळी तयार करत पुराणापासून बचाव करणे करण्यासाठी लागणाऱ्या उपायोजना व घोषना देत जनजागृती केली. यावेळी शाळेचे सचिव प्रशांत नरके हे उपस्थित होते उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका प्रियंका थोटे पर्यवेक्षिका मयुरी खोबरे,संतोष रखे,कल्याणी कुलकर्णी,संतोष बांगर, मोनिका बोडके,अविनाश बांगर,प्रगती पहाडे, संदीप बर्वे,वैष्णवी देशमाने, ऐश्वर्या जाधव,सुंदर थोरे,जयश्री डिक्कर हे प्रयत्न करत आहेत.

शनिवार, १४ मार्च, २०२०

मातंग समाज संघ वतीने औंरंगाबाद येथे बैठकिचे आयोजन.
औरंगाबाद /प्रतिनिधी :- मातंग समाज संघ वतीने बैठक चे बैठक 
 मातंग समाज संघ चे संस्थापक अध्यक्ष मा.एडवोकेट गायकवाड साहेब यांच्या आदेशाने घेण्यात आली.हया बैठकीत खालील विषय चर्चा करण्यात आली.1) पुढील मिटिंग सर्वांना सोईस्कर रविवार या सुट्टीच्या दिवशीच घ्यावी (2)वधुवर परिचय मेळावा चे नियोजन करणे (3) बचत गट स्थापण करून बचत गटाचला आर्थिक बळकटी देणे (4)इयत्ता दहावी आणि बारावी साठी परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे (5) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सरकारी योजना बाबत मार्गदर्शन करणे. मिटिंग मधे मा श्री अरुण आव्हाड साहेब(औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष)मा श्री सिध्दांत कांबळे साहेब (औरंगाबाद जिल्हा प्रभारी) मा श्री प्रभाकर पोळ साहेब (औरंगाबाद शहर अध्यक्ष) मा सौ सविता ताई गायकवाड (औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा) तसेच  मा संतोष नाडे साहेब हे उपस्तिथ होते.मातंग समाज संघ- औरंगाबाद




श्री साईबाबांच्या पदकमलाने  तसेच वास्तव्याने पावन झालेल्या  सर्वप्रथम साईभक्त चांद पटेलांची कर्म  भूमी धुपखेडा वरून प्रसिद्ध होणाऱ्या "श्री साईबाबा सेवा  साधना आश्रम" संचलित "साई संस्कार "मासिके च्या वतीने मान्यवरांच्याा उपस्थितीत मा.श्री.ए.के डोंगरे (आय ए एस) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून -श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिरडी) नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच   श्री साईबाबा सेवा साधना आश्रम धुपखेडालाही भेटीचे  निमंत्रण  देण्यात आले या वेेेेळी साई संस्कार या मासिकाचे कार्यकारी संपादक : हिराजी कारके,साई भक्त वेदांत कांबळे, श्री. दशरथ तुपे ( नगरसेवक ),पत्रकार श्री किरण वाबळे इत्यादी उपस्थित होते

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...