शुक्रवार, २० मार्च, २०२०

      अवैद्य वाळू चोरी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 42 चौक्याची               स्थापना प्रत्येक वाळू वाहनाची होणार तपासणी.
नांदेड /प्रतिनिधी (भगवान कांबळे) :-जिल्ह्यात
एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळू चोरी आणि अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने जिल्ह्यात ४२ ठिकाणी संयुक्त चौक्या उभारल्या आहेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक वाळू वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत राजकीय कलगीतुराही अनेकदा रंगला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीचा विषय गांभीर्याने घेताना जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची बैठक घेवून वाळू चोरीवर आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४२ चौक्या उभारण्यात येणार आहेत. या चौक्यांमध्ये नांदेड तालुक्यात ८ चौक्या राहणार आहेत. त्यात असर्जन येथील जुना जकात नाका, निळा रोड येथील जयभवानी चौक, वाय पॉर्इंट, पासदगाव येथील जाधव पेट्रोलपंप, कामठा येथील शंकरराव चव्हाण चौक, ब्रह्मपुरी येथील बोंढार ब्रीजजवळ, धनेगाव चौरस्ता येथील वाघाळेकर पेट्रोलपंप, हस्सापूर टी पॉइंट आणि वाजेगाव चौरस्ता येथे चौक्या राहणार आहेत.भोकर तालुक्यात उमरी टी पॉइंट, उमरी रोड, मुदखेड तालुक्यात आमदुरा, हदगाव तालुक्यात उमरखेड पॉइंट, बामणी फाटा आणि तामसा येथे तामसा चौक, हिमायतनगर तालुक्यात पळसपूर चौक, कामारी चौक, किनवट तालुक्यात कोठारी चि., घोटी, माहूर तालुक्यात केरोळी फाटा, लांजी पॉइंट, कंधार तालुक्यात गोळेगाव पाटी, तेलूर फाटा, लोहा तालुक्यात शिवाजी चौक लोहा, माळेगाव, सोनखेड आणि मारतळा (हातणी पाटी), देगलूर तालुक्यात सांगवी उमरी गावात शेवाळा नंदूर रस्त्यावर, धर्माबाद तालुक्यात बाभळी चौक, राजापूर, सिरजखोड फाटा, उमरी तालुक्यातील कारेगाव फाटा, बळेगाव चौक, हातणी चौक, बिलोली तालुकतील हुनगुंदा, जुने गावठाणजवळ, येसगी मांजरा नदीजवळील पुलाजवळ, आदमपूर, नरसी ते देगलूर रोडवर, आदमपूर कमान, लोहगाव फाटा आणि  नायगाव तालुक्यातील वजिरगाव फाटा, बळेगाव व गडगा येथे या चौक्या राहणार आहेत. वाळू वाहतूक होणाऱ्या भागांचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. ईटणकर यांनी ज्या भागातून वाळू वाहतूक होते त्या भागातील चौक्यांची माहिती मागवली होती. या चौक्यावर पोलीस, महसूल  आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पोलीस व महसूल विभागाने संयुक्त पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४२ चौक्यांची ठिकाणे निश्चित केली असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. या चौक्यांमध्ये आणखी वाढ केली जाईल, असेही मगर यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील सर्व अस्थापना व दुकाने 21व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश.                                          जालना प्रतिनिधी   :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा
 प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 व 22 मार्च, 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जालना रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.  यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सुट देण्यात आली असुन शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतुक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना *वगळता* एमआयडीसीमधील कारखाने व ईतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुहावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे याच्यावर केलेल्या कारवाईमुळे
 छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक अधीक्षकांची भेट घेऊन मानले आभार.
प्रतिनिधी | बीड  अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त दाभाडे याच्यावरती केलेली कारवाही प्रशंसनीय असून
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य गौरवास्पद आहे.असे बोलताना छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. छावा क्रांतिविर सेनेच्या माध्यमाने वेळोवेळी नियोदन देऊन पण हे आधिकारी काही कार्यवाही करत नव्हते यासिठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हा आधिकारी कार्यलयासमोर उपोषन हि केले. तरी हे आधिकारी कार्यवाही करु हे पण लिहुन देण्यासाठी तयार नाहीत,याचे कारण लाच लुचपत प्रतिबंधक अधीक्षकांच्या कार्यवाही मुळे स्पष्ठ झाले.
म्हणुन छावा क्रांतिवीर सेना बीड  जिल्हा  वतिने लाच लुचपत विभाचे आभार मानले.
यावेळी उपस्थित छावा क्रांतिवीर सेना  जिल्हाप्रमुख राहुल चाळक, अविनाश तांदळे, मुक्ताराम मोटे , ऋषिकेश परदेशी,संचार उमप,सोमनाथ मोटे,आदी उपस्थित होते.


सदर बाजार पोलीसांची धडाकेबाज कारवाई पकडली देशी-विदेशी दारु चा अवैध साठा जप्त
जालना प्रतिनिधी :- सदर बाजार पोलीसांची 
धडाकेबाज कारवाई केली आहे. व कार्यवाहीत देशी-विदेशी दारु चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.स्वत:च्या राहत्या घरातून गैर मार्गाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 48 हजारांचा मुद्देमाल सदर बाजार पोलीसांनी जप्त केला आहे. शहरातील संग्राम नगर व लोहार मोहल्ला या ठिकाणी बुधवारी (ता.18) पोलीसांनी ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहती अशी की, जालना शहरातील संग्रामनगर परिसरातील सोनु बाबुलाल ढोलके (वय 27) व लोहार मोहल्ला परिसररातील दोन महिला हे त्यांच्या राहत्या घरातून अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय करित असल्याची गोपनिय माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना एका खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांचे एक पथक लोहार मोहल्ला व संग्रामनगर परिसरात पाठविण्यात आले होते.संबंधीत आरोपींच्या घरावर पोलीसांनी छापा मारला असता तिन्ही ठिकाणी दारुचा अवैध साठा आढळून आला. यामध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारुचे 4 खोके, तर देशी मद्याचे 8 खोके पोलीसांनी या तीघांच्या घरातून जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मद्याची किंमत ही चालु बाजारभावानूसार 48 हजार असून संबंधीत आरोपीविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अतिरीक्त पोलीस अधिक्षक समाधान पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, कर्मचारी अशोक जाधव, दिपक घुगे, समाधान तेलंग्रे, सोपान क्षिरसागर, बंटी ओहोळ, रमेश फुसे, महिला कर्मचारी सिंधु खर्जुले आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कर्जत येथे ग्रामपंचायत च्या वतीने कोरोणा व्हायरस संदर्भात ग्रामस्थांमध्ये जनजागृती चे आयोजन.
अंबड / प्रतिनिधी :- राज्यभरात कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव दिसून येत आहे. या आजराचा प्रादुर्भाव ग्रामिण भागात पोचू नये, कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण्यासाठी दिनांक 21/03/2020 ते 31/03/2020 या कालावधीत गावातील लग्न, किर्तन, प्रवचन,हरिनाम सप्ताह, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, शिबिरे, कार्यशाळा ज्यासाठी दहापेक्षा ( 10 ) जास्त लोक एकत्र येतील असे कुठलेही ही सार्वजनिक कार्यक्रम ग्रामपंचायतीचे हद्दीत आयोजित करण्यात येऊ नये.सर्व ग्रामस्थांनी स्वतः बरोबर कुटुंबाची तसेच गावाची काळजी घ्यावी.मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद  अशा शहरांमधून बाहेर गावावरून आलेले विद्यार्थी व नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी करून जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी या आदेशाचे उल्लंघन करन्यात येऊ नये याची गांभीर्याने नोंद घ्यावी व व ग्रामपंचायतीस तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे आणि शासनाच्या नियमावली चे पालन करा.अशी विनंती कर्जत येथील सरपंच श्रीहरी पाटील डोंगरे,माजी सरपंच विजय डोंगरे, भारत वाघ, गोविंद वाघ,  उमेश डोंगरे,यांनी ग्रामस्थांना केली.

गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना बाबत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षास प्रदेशातून किंवा जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना जि. प्रतिनिधी :-  कोरोना बाबत जिल्हास्तरीय  आपत्कालीन नियंत्रण कक्षास परदेशातून किंवा जिल्ह्याबाहेरून  जालना जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनी माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग आजाराबाबत (कोविड-19) जिल्हास्तरावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामध्ये कार्यरत अधिकारयांद्वारे परदेशातून किंवा जिल्ह्या बाहेरून जालना जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रित केली जात आहे.
        या नियंत्रण कक्षातून संबंधित व्यक्तींना थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात आहे . यावेळी त्यांना कोरोना संसर्गाच्या सतर्कतेच्या दृष्टीने माहिती विचारली जात असून ती माहिती संबंधित व्यक्तींनी कोणतीही शंका मनात न ठेवता विचारणाऱ्या द्यावी.याच बरोबर अशा कोविड- 19  चा  प्रादुर्भाव झालेल्या  देशातून  अथवा  जिल्ह्यातून  आलेल्या व्यक्तींनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 क्रमांकावर संपर्क साधून सकाळी 10 :30 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वतःहून आपली प्रवासाबद्दल तसेच या आजाराबद्दल काही लक्षणे जाणवत असल्यास त्याची माहिती द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.परदेशातून किंवा बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या या व्यक्तींच्या प्रवासाच्या दिवसापासून 14 दिवसांच्या प्रकृतीविषयी  निरीक्षण  ठेवणे गरजेचे  आहे. त्याची माहिती या आजाराचा  धोका  रोखण्यासाठी या नियंत्रण कक्षाद्वारे घेतली जाईल.   
     जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असून यासाठी कोणतीही शंका मनात बाळगू नये असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
 शेजारच्या तरूणाने आपली मुलगी पळवून नेली या संशयावरून त्या तरूणाच्या घरावर हल्ला करून त्याच्या भावाचे मुंडके छाटल्याची खळबळजनक घटना वैजापूर जवळच्या लाख खंडाळा या गावी शनिवारी मध्यरात्री घडली.
वैजापूर | प्रतिनिधी या भयानक घटनेत मदतीला धावून आलेले त्याचे आई-वडीलही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपी दोघा भावांना अटक केली आहे.

संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणार्‍या या धक्कादायक घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्याती लाख खंडाळा गावच्या शेतवस्तीवर गायकवाड आणि देवकर कुटुंब शेजारी शेजारी राहतात. बाळासाहेब गायकवाड कुटूंबातील मोठा मुलगा अमोल हा तीन दिवसापूर्वी कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घराकडे फिरकलेला नाही. विशेष म्हणजे शेजारी राहणार्‍या देवकर कुटूंबातील मुलगी नेमक्या याच सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. शेजारी राहणार्‍या अमोल गायकवाडनेच आपल्या मुलीला पळवून नेले या संशयावरून शनिवारी रात्री रोहिदास आणि देविदास हे दोघे देेवकर बंधू तलवार व कोयते घेऊन गायकवाड यांच्या घरावर चालून आले आणि त्यांनी झोपेत असलेल्या गायकवाड कुटूंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अमोलचे आई अलकाबाई गायकवाड (41) आणि वडील बाळासाहेब गायकवाड (47) गंभीर जखमी झाले. या अवस्थेतही त्यांनी भाऊ दादासाहेब गायकवाड यांचे घर गाठून हा प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी बाळासाहेब गायकवाड यांचा दुसरा मुलगा भीमराज (17) हा घरात झोपलेला होता. घराबाहेर काय चालले आहे हे समजण्यापूर्वीच देवकर बंधूनी तो झोपेत असतनांच तलवारीने वार करून त्याचे शीर धडा वेगळे केले आणि तेथून ते दोघेही पसार झाले. या अमानुष घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. अमोलच्या जखमी आई-वडीलांना वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीमराजचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.  या  प्रकरणीवैजापूर पोलीस ठाण्यात अट्रासिटी अॅक्ट नुसार दाखल करण्यात आला कलम गुन्हा ३०२, ३०७ प्रमाणे दाखल करण्यात आला.
एल सी बी चे पी आय भागवत साहेब पुदें साहेब  हे काॅ भालेराव रमेश आपसनवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.....

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...