अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2
या वेळेतच सुरु ठेवावीत.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी
जालना,प्रतिनिधी:- जालना शहरासह जिल्ह्यातील सर्व दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, घरगुती गॅस व औषधी दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच सुरु ठेवावीत. या व्यतिरिक्त ईतर सर्व दुकाने
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 302 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-15, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 304 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 302 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 766 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 38 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 449 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 20 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 544 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 515, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 91, एकुण प्रलंबित नमुने-22 तर एकुण 411 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 89, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 27, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -302, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-09, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 38, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.







