मंगळवार, ५ मे, २०२०
सोमवार, ४ मे, २०२०
लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम चालकांचे परवाने रद्द करा
अखिल भारतीय सेनेच्या नंदा पवार यांची मागणी.
जालना,प्रतिनिधी:- कोवीड १९या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्या परमीटरूम मालकांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या जालना महिला शहराध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आज(ता.४) नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपरोक्त संदर्भात एक निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की,कोवीड१९या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात जालना शहरात आणि परिसरात परमीटरूम मालक -चालक अवैधरित्या मद्य विक्री करीत आहेत, शिवाय मद्यची अवैधरित्या वाहतूक करीत आहेत.लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू ,औषधी वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत.मद्य विक्री तर बेमुदत बंद आहे.अशा परिस्थितीत जालना शहरातील आणि परिसरातील परमीटरूम मालक-चालक अवैधरित्या मद्य विक्री करीत आहेत.गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने यासंदर्भात परमीटरूम मालक-चालक यांच्याविरोधात कारवाई केली आहे.वास्तविक पाहता अवैधरित्या मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे.मात्र या विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम मालक-चालक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लागेबांधे आहे,हे यावरून सिद्ध होते.अवैधरित्या मद्य विक्री रोखण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारूच्या अड्डे उध्दवस्त केले.जालना शहरात लाॅकडाऊनच्या काळात परमीट रूम फोडून तेथून मद्याचे बाॅक्स चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत.हा परमीटरूम मालक-चालक यांनी केलेला बेबनाव आहे,मद्याच्या बाटलीवरील पॅकींग नंबरची चौकशी केली तर यामागील सत्य बाहेर येईल.जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करून अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम मालक-चालक यांच्याविरोधात कारवाई करावी तसेच त्यांचे परवाने रद्द करून या मंडळींना पाठीशी घालणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही नंदा पवार यांनी या निवेदनात केली आहे.
ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सॅनिटाझर व मास्क वाटप करून साजरा केला वाढदिवस.
जालना प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्येकर्ते जालना तालुका भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष व जालना रो.ह.यो. अध्यक्ष
श्री.ज्ञानेश्वर पाटील शेजुळ यांनी कोरोना विषाणूच्या पाश्वभूमी वर वारेमाप खर्चाची उधळपट्टी न करता सोनदेव गावातील गरजू नागरिकांना सॅनिटाईझर व माँस्कचे वाटप करत अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.आज दि. ४ मे रोजी ज्ञानेश्वर शेजुळ यांचा वाढदिवस होता गेल्या अनेक वर्षांपासून श्री शेजुळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असते ग्रामिण भागातील जनतेवर भूकंप गारपीट अतिवृष्टी सारखे प्रसंग सर्व सामन्यावर उधवल्यास ज्ञानेश्वर शेजुळ हे मदतीसाठी अग्रस्थानी असतात त्यांना सर्वं सामन्याची काळजी वाटत असते.त्या पाश्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत व शासनाच्या नियमांचे पालन करत आज शेजुळ यांनी आपल्या निवास स्थानी थांबनेच पसंत केले व जालना जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांना सुद्धा घरातच थांबण्याचे व सुरक्षित राहून कोरोना थांबण्याचे आवाहन करत श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केल्याने त्यांचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे.
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...





