शनिवार, ९ मे, २०२०

वंचित बहुजन आघाडी तर्फे हॅन्ड ग्लोज  व मास्क वाटप



परतुर प्रतिनीधी :- परतुर तालुक्यातील आष्टी येथे वंचित बहुजन आघाडी चे  राष्ट्रीय नेते आदरणीय एॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमीत्त आष्टी शहरात  ग्रामपंचायत सफाई महिला कामगारांना हॅन्ड ग्लोज व मास्क चे वाटप करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष  रोहन वाघमारे,आकाश वाघमारे,आकाश मुंडे  उपस्थित होते.

बीड हॅलो रिपोर्टर

जम्मुचे दोन यात्रेकरू नांदेडला कोरोनाग्रस्त! - नांदेडमधील बाधितांची संख्या ४४


नांदेड (भगवान कांबळे ) :- जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोना ची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. नगिनाघाट परिसरातून गुरुवारी सायंकाळी काही यात्रेकरूंचे स्वब तपासणीसाठी घेतले असता त्यातील हे दोघे बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे नांदेडला कोरोना बाधितांची संख्या आता ४० झाली असून यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी रविनगर कौठा येथील आढळलेला कोरोना बाधित ट्रक चालक अनेक महिन्यापासून घरीच गेला नसल्याची माहिती मिळाल्याने तूर्तास त्या परिसराला कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.होळी सणादरम्यान नांदेडमधील होला महल्ला उत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून शीख यात्रेकरू नांदेडमध्ये दाखल झाले. टप्याटप्प्याने हे यात्रेकरू नांदेडला दाखल होत असताना तिकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात  लॉक डाऊन सुरू झाले. प्रवासी वाहतुकीची खाजगी व सरकारी साधने बंद करण्यात आली. दळणवळण ठप्प झाल्यामुळे सुमारे चार हजार यात्रेकरू नांदेडला अडकून पडले. काही दिवसापूर्वी पंजाब राज्यातील यात्रेकरू शासनाच्या परवानगीने त्यांच्या गावी पोहचले असले तरी इतर बऱ्याच राज्यातील यात्रेकरू अजूनही नांदेडला अडकून आहेत.दरम्यान, नांदेडला अडकलेल्या यात्रेकरूंची स्क्रिनिंगद्वारे वेळोवेळी  वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु येथून पंजाबला गेल्यानंतर बरेच प्रवासी कोरोनाग्रस्त निघाल्याने आढळल्याने नांदेडला त्यांच्या संपर्कात आलेल्या व येथे थांबलेल्या यात्रेकरू व इतर व्यक्तींचे स्वब घेणे सुरू आहे. नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वब घेण्यात आले असून या परिसरात थांबलेले जवळपास ३० जण आतापर्यंत कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब घेणे सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी संत बाबा बलविंदर सिंघजी यांची भेट घेऊन सर्वांना स्वब देण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी दस्तुरखुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीदेखील नगिनाघाट येथे जाऊन बाबाजींशी चर्चा केली. त्यानंतर जम्मू येथील १४ व हरियाणा येथील दोन यात्रेकरुंनी आपले स्वब आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. याच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या इमारतीत आरोग्य सेवा पुरवून बाधित व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. त्यामुळे स्वब घेण्यापासून देखभाल करणे व पुढील उपचाराचे काम आणखी सुलभ होणार आहे.

बीड हॅलो रेपोर्टेर

उमरी तालुक्यातल्या मौ.शिरुर येथील वयोवृध्द महिलेच्या हत्येतील आरोपी निष्पन्न...



उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला यशस्वी तपास

नांदेड(भगवान कांबळे) :- उमरी तालुक्यातल्या मौ.शिरुर येथे दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी ८५ वर्षीय वयोवृध्द महिला किशनबाई पुंडलीक पडोळे यांची दुपारी ०२-०० वाजल्याचे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे डोक्यात लाकडी धीपली मारून गंभीर जख्मी करून निर्घृण खुन केल्याची व गळ्यातील सोन्याची पोत व कानातील मुद्या काढून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटने संदर्भात मयत वृध्द महिलेचा नातु साईनाथ गंगाधर पडोळे रा.शिरुर ता.उमरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून उमरी पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात दि.२६ फेब्रुवारी २०२० रोजी गुरक्र.३९/२०२० कलम ३०२,३९४ भादपी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या वृध्द महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात उमरी पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सदरील गुन्ह्याचा तपास जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला.या गभीर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा तपास विविध पध्दतींचा अवलंब करून तसेच तांत्रिक पुरावे हस्तगत करून दि.०६ में २०२० रोजी आरोपी शिवाजी रावसाहेब पडोळे वय ३० वर्षे रा.शिरुर ता.उमरी यास अटक केली सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली यावेळी तपासा दरम्यान आरोपीने मयत वृध्द महिलेच्या अंगावरील काढून घेतलेले गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याच्या मुद्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पुढील तपास चालु असल्याचे सभामजते.

सदरील खुनाचा तपास यशस्वीपणे करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाचन पोलीस उपनिरिक्षक गणेश राठौड,उमरी पोलीस स्थानकाचे पो.नि.अनंत्रे,सपोनि.शेवाळे,स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील सपोनि.नाईक व त्यांच्या पथकातील कर्मचारी,धर्माबाद पोलीस स्थानकाचे पोउपनि.सनगल्ले,पोना.शितळे,पो.शिपाई फिरोज शेख,पो.शिपाई घोंसले,या सर्वांच्या मदतीने कोवीड-१९ प्रतिबंध बंदोबस्ताचे आव्हान सांभाळत सदरील गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने यशस्वीपणे करून घटनेतील आरोपीला जेरबंद केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व त्यांच्या पथकाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.....

बीड हॅलो रेपोर्टेर

छत्रपती अन्न सहाय्यता छत्राच्या माध्यमातून मोतीगव्हाण येथे गरजुंना धान्य वाटप


 जालना (प्रतिनिधी) :- कोरोना या संसंर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यावर नाही तर खेड्यापाड्यांवर सुद्धा मोठे संकट आले आहे. मोलमजुरी करून खाणारे लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने जालना जिल्ह्यातील बाजीउम्रद, माणेगाव (जा), माणेगांव (खा), राममुर्ती, सावरगाव, सावंगी तलाव, ब्राम्हणखेड, सिंधीकाळेगाव, मोतीगव्हाण,  येथे धैर्यशील अरविंदराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून गोर-गरीब गरजुंना धान्य वाटप करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरू आहे.
याप्रसंगी बोलतांना धैर्यशील चव्हाण म्हणाले की, सद्या लॉकडाऊन असल्यामुळे ज्या गरजुंना धान्यांची गरज भासेल त्यांनी संपर्क साधावा त्यांना छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून दिले जाईल. मोतीगव्हाण येथे छत्रपती अन्न सहाय्यता छत्रचे सहकारी उमेश मोहिते यांच्या हस्ते गरजुंना धान्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत विठ्ठल मोहिते, गणेश मोहिते, महादेव मोहिते, प्रवीण मोहिते, निवृत्ती घडलींग, आदित्य मोहिते आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल सर्व गावातील नागरीकांतून आभार व्यक्त करण्यात येत आहे. 

बीड हॅलो रिपोर्टर

आ.कैलास गोरंट्याल यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी

जालना (प्रतिनिधी) :- नगर पालिकेच्या वतीने शहरात  मान्सून पूर्व मोठ्या  नाल्यांची साफसफाई  कामांची सुरूवात करण्यात आली असून शनिवारी ( ता. ०९) आ.कैलास गोरंट्याल यांनी या कामांची पाहणी केली.आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेच्या वतीने मोठ्या नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून भाग्यनगर भागातील मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. आ. कैलास गोरंट्याल यांनी कामास भेट देऊन पाहणी केली.या वेळी  बबलू चौधरी,राम सावंत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद ,नगरसेवक जीवन सले,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष  नंदकिशोर  जांगडे , स्वच्छता विभाग प्रमुख, संजय वाघमारे , स्वच्छता निरीक्षक सॅमसन कसबे ,,अरुण, वानखेडे, संदीप वानखेडे.यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नाले साफसफाईसाठी तीन जेसीबी ,पाच ट्रॅक्टर, पाच टिप्पर व सफाई कामगार असा मोठा लवाजमा तैनात करण्यात  करण्यात आला आहे. सदरील काम हे एक महिना चालणार असून यामध्ये शहरातील विविध ठिकाणचे एकूण 35 नालेसफाई करण्यात येणार असल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे यांनी सांगितले. या वेळी प्र.स्व.निरिक्षक रवींद्र कल्याणी, दफेदार श्रावण सराटे, सागर कदम आदी उपस्थित होते.






नगर पालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामांची आ.कैलास गोरंट्याल यांनी पाहणी  केली. या वेळी बबलू चौधरी, शेख मेहमूद, राम सावंत, नंदकिशोर जांगडे, जीवन सले, आदी.


लाँकडाऊनच्या काळात विद्यार्थी आपल्या आवडत्या विषयाला देतात वाव

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी ):- सर्व परिक्षा झालेल्या असुन निकालाची वाट पाहणे सुरू आहे. माञ कोरोना ने खुप उग्र रूप धरले आहे.निकाल कधी आणी कसा येणार आणि आपन पुढे काय करावे आणि कसे करावे हि चिंता विद्यार्थी यांच्या मनात आहे. आणि त्यातुन दिलासा भेतन्यासाठी ते आपल्या आवडत्या विषय कडे वळले. असुन चिञकला हा विषय तासन तास हाताळत आहे. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील नंदकिशोर नारायण गिराम. या विद्यार्थीयाने B. A. ची परिक्षा दिली असुन चिञकला या विषय कडे आपली चांगली आवड म्हणुन पाहतो  .गणपती ,साई बाबा, आणि थोर पुरूष यांचे सुबक चिञ  हुबेहुब काढण्याचा छंद जोपासत आहे.असे नंदकिशोर गिराम याने सांगितले. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील नंदकिशोर गिराम याने हुबेहुब साईबाबा यांचे चिञ काढताना दिसत आहे.





बीड हॅलो रेपोर्टर

रेल्वे अपघात १६ कामगार मृत्युमुखी पडले या अपघाताला जबाबदार जालना तहसीलदार यांना निलंबित करून   कंपनी मालक याच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे - प्रकाश सोळंके


मनसे च्या वतीने मुख्यमंत्री मोहदय यांना निवेदन.



 जालना,प्रतिनिधी :- जालना एमआयडीसी येथे एका स्टील कंपनी कामगार काम करीत होते, लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जालना येथून औरंगाबादच्या दिशाने जाण्यासाठी निघाले होते,१९ कामगारांपैकी १६ कामगार रेल्वे अपघात मृत्युमुखी पडले, या कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला होता का नाही, जर संपर्क केला असेल तर ते पाई का निघाली होते, त्यांना जालना तहसीलदार त्यांनी योग्य मार्गदर्शन का केले नाही या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या जालना तहसीलदार यांना निलंबित करून, या संबंधित कंपनी मालकावर निष्काळजीपणा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे.

         मुख्यमंत्री सहायता निधीतून या कामगारांना ५ लाख रुपये मदत जाहीर केल्याबद्दल श्री .प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री मोहदय यांचे मनापासून आभार मानले.

या रेल्वे अपघातातील १६ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार जालना तहसीलदार व कंपनी मालक असल्यामुळे तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी श्री.प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदनात केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...