रविवार, १० मे, २०२०


         वर्दीतला देवमाणूस आला धावुन मदतीला

कोरोना; एकीकडे कतृव्य बजावणे,त्याचबरोबर गरजूंना मदत करणे.




जालना,प्रतिनिधी :- जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार श्री.सतिष ढिलपे हे कोरोना पासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत.त्याच बरोबर गोरगरीब व गरजू व्यक्तींना पोटापाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी वेळोवेळी आपल्यापरीने  गरजूंना मदत करीत आहेत.संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव भारतामध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोना ने जास्तच थैमान घातले आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे पर्यंत संपूर्ण देश लाॕक डाऊन वढवण्याचे निर्देश दिले आहेत. देशात व महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापार बंद झालेले आहेत. अशा स्थितीत मोलमजुरी करून ऊदरनिर्वाह करणाऱ्यांची बिकट स्थिती होत आहे.
त्याच प्रमाणे जालना शहरातील बऱ्याच  भागामध्ये कामगार,मजूर व हातावर काम असणारे बरेच कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु लाॕक  डाऊन मुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्या अनुषंगाने वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवलदार श्री.सतीष ढिलपे,सोबत त्यांची पत्नी कविता ढिलपे,मुले नेहा,नितिश,यश तसेच आई-वडील व सासू-सासरे यांच्या ऊपस्थिती मध्ये रामनगर पोलीस काॕलनी माध्ये तांदुळ वाटप करण्यात आले.

जालना जिल्ह्यात 10 मे रोजी तीन व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.




जालना,प्रतिनिधी :- रंगनाथनगर इंदेवाडी परिसरातील 22 वर्षीय गर्भवती महिला तसेच कानडगांव  ता. अंबड येथील 29 वर्षीय तरुण व 52 वर्षीय महिला यांच्या स्वॅबच्या नमुन्याचे अहवाल दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांनी दिली.
रंगनाथनगर इंदेवाडी पाण्याची टाकी, परिसर येथील 22 वर्षीय गर्भवती महिला सर्दी झाल्यामुळे शहरातील एका खाजगी दवाखान्यात झाली होती. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती सदरील महिलेस न्युमोनिया झाल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी संबंधित महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयास रवानगी केली. दि. 8 मे 2020 रोजी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. त्याच दिवशी स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल दि. 10 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह  प्राप्त आहे तसेच कानडगांव ता. अंबड येथील  29 वर्षीय तरुण मुंबई येथुन 52 वर्षीय आई व 58 वर्षीय वडील यांच्यासह गावाकडे आला होता. संबंधितांना गावातील नागरिकांनी तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते. तेथील डॉक्टरांनी या तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, जालना या ठिकाणी पाठविले. या तिघांपैकी आई व मुलगा यांच्या स्वॅबच्या नमुना प्रयोगशाळेकडून दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह तर सदर तरुणाच्या वडीलांच्या स्वॅब निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन तालुकास्तरीय पथकाने रंगनाथ नगर पाण्याची टाकी परिसर, जालना व कानडगाव ता. अंबड येथे घटनास्थळी भेट देऊन कन्टेटमेंट प्लानच्या अनुषंगाने सुचना दिल्या. सदरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहवाशीतांच्या पाठपुराव्यासाठी पथके तयार करण्यात आलेले असुन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु केले आहे.
   जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत  उत्तरप्रदेश – 4003,बिहार-2575, मध्यप्रदेश-877, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 422, यासह उर्वरीत बारा राज्यातील एकुण -9793 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 3027 अशा एकुण 12820 नागरीकांना पास उपलब्ध  करुन देण्यात आले आहेत. 
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 83 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 1284 असे एकुण – 1367 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातुन  आजपर्यंत बिहार – 20, आंध्रप्रदेश -46, ओरिसा- 83, मध्यप्रदेश -687, छत्तीसगड -08, उत्तर प्रदेश- 1327,झारखंड -03, राजस्थान- 59, तेलंगणा- 2 असे एकुण 2225 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकुण 1367 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 31 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 800 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 08 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1144 एवढी आहे.दैनिक पॉझिटीव्ह नमुने -03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -11 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1121, रिजेक्टेड नमुने-04,पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने-08 तर एकुण 769व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-17, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 571 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या -67, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -285, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित- 07, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -31, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -00, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 261 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 285व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना– 02, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-14,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -91, मॉडेल स्कुल अंबा रोडपरतुर-27, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 15, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद – 06, डॉ.बाबासाहेब  हॉस्टेल भोकरदन-23  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्रं 1-64,    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड – 06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल घनसावंगी -09  येथे  अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 516 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 83 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 571 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 81 हजार  300 असा एकुण  3 लाख 81 हजार   8 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश च्या 38 कामगारांना घेवुन महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस झाली रवाना



निलेश लोहिया यांच्या कडून कामगारांच्या जेवन,बिस्कीट दुधाची व्यवस्था


अंबड/अरविंद शिरगोळे : येथून उत्तर प्रदेश च्या 38 कामगारांना घेवुन महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस आज दि.10 मे रोजी दु.1 वा जालना येथे रवाना झाली असून जालना येथून सदरील कामगार रेल्वेने आपल्या गावी पोहचणार आहेत उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल व तहसीलदार राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार एन.वाय दांडगे,मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर,कैलास राठी,तलाठी श्रीपाद देशपांडे,अव्वल कारकुन यु.डी.जाधव व शिरसाट यांनी उत्तर प्रदेशला जाणाऱ्या बसला रवाना केले सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाती ट्रेडर्सचे निलेश लोहीया यांनी जेवन,बिस्कीट, पाणीबाँटल तसेच लहान बालकांसाठी दुधाची व्यवस्था केली होती.

अवैद्य धंद्यावर अंबड पोलिसांची कारवाई दोन लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त १३ जनांवर गुन्हा दाखल


अंबड पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी शेवगण व पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

अंबड/प्रतिनिधि:- कोरोनो च्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनच्याकाळात अंबड शहरात व व आजूबाजूच्या परिसरात अवैद्य धंदे चोरीछुपे चालू असतानाच अंबड पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी शेवगण व पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई विविध ठिकाणी विविध कंपन्या घुटका, सुगंधी, तंबाखू, हातभट्टी (गावठी दारू), व जुगार अड्ड्यावर छापा मारून तब्बल २ लाख  ५३ हजार ४३६ रुपयांचा मोठा साठा मुद्देमाल जप्त केला असून १३ जना विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना गुप्त बातमीदार मार्फत अंबड शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी घुटका, सुगंधी, तंबाखू, हातभट्टी (गावठी दारू), व जुगार खेळत असणाऱ्या अड्डयाची माहिती मिळाल्यावरून नांदेडकर यांनी त्यांचे पोलिस पथकास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी  कार्यवाही करणे कामे रवाना केले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून शहरातील महबूब नगर मधील एका घरासमोरील गाडी क्रमांक. एम एच २७ ऐसी  ४५०१ या कामध्ये रत्ना जीवन घुटका, एम. सुगंधी तंबाखू, एन. पी.०१ जाफरानी दर्जा, व्ही.१ तंबाखू असा बंदी असलेला घुटका व सुगंधित तंबाखू सचिन पिता वीरेंद्र गुप्ता यांच्याकडे असून तो इसम सदरचा माल विक्री करण्याच्या तयारित असताना पोलिसांनी छापा मारून त्याच्या ओमिनि कार सह त्याच्या घरात घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांनी बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा रुपये १ लाख २८,४४६ व एक ओमिनी गाडी जिचे अंदाजे किंमत ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सचिन वीरेंद्र गुप्ता यांचे विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय अन्य विविध ठिकानाच्या  हातभट्टी (गावठी दारू), जुगार अड्डे यांचेवर छापे मारून दारूच्या रसायाना सह ४४ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अन्य १२ जना विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची धडाकेबाज कार्यवाही अंबड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी.शेवगन, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पो.कौ. महेश खैरकर, पो.कौ.साळवे,  पो.कौ गोफने, पो.कौ.गोतीस, पो.कौ.डोईफोडे, पो.कौ.दराडे वाहनचालक यादव यांनी केले आहे.

शनिवार, ९ मे, २०२०

       आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुढाकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील चार महत्वाच्या खासगी रुग्णालयात होणार महात्मा फुले जनारोग्य योजनेंर्गत उपचार


मराठवाड्यातील रुग्णांना मिळणार मोफत उपचाराचा लाभ



जालना,प्रतिनिधी:- औरंगाबाद येथील शेठ नंदलाल धूत, कमलनयन बजाज, एमजीएम आणि डॉ. हेडगेवार ही चार महत्वाची रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. योजनेच्या यावर्षीच्या नविन करारा संदर्भात या रुग्णालयांच्या काही हरकती व शंकांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निरसन करून रुग्णालयांना योजनेंतर्गत समावेश असलेले उपचार देण्याविषयी आवाहन केले. त्याला प्रतिसाद  देत आज झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे आता मराठवाड्यातील सामान्य जनतेला मोफत उपचार मिळू शकतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.औरंगाबादला कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज येथे भेट दिली. यावेळी त्यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दली. तेथील व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या व्यवस्थापन प्रमुखांसमवेत बैठक घेतली.
शहरातील धूत, बजाज, एमजीएम, डॉ. हेडगेवार ही मोठी रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी होते. मात्र यावर्षीच्या नविन कराराबाबत या रुग्णालयांच्या काही हरकती, शंका होत्या त्यावर  या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी या हरकती आणि शंकांचे निरसन केले आणि रुग्णालयांना आश्वासीत करतानाच सुधारीत करारानुसार नागरिकांना उपचार देण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत यावेळी करारावर रुग्णालय व्यवस्थापनाने स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार आता या चार रुग्णालयांच्या माध्यमातून सामान्यांना उपचार मिळू शकतील.
या बैठकीस खासदार भागवत कराड, एमजीएम हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुर्यवंशी, डॉ. हेडगेवार हॉस्पीटले डॉ. तुपकरी, डॉ. पांढरे, धुत हॉस्पीटलचे डॉ. गुप्ता, बजाज हॉस्पीटलचे डॉ.श्रीवास्तव, डॉ. पठाण आदी यावेळी उपस्थित होते.महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य  योजनेमध्ये राज्यातील १००० रुग्णालयांचा समावेश असून त्यामध्ये कोरोना आणि कोरोना शिवाय अन्य आजारांसह महाराष्ट्रातील १०० टक्के जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी बाळंतपण आणि सिझेरियन खासगी रुग्णालयात होत नव्हते. आता या योजनेंतर्गत त्याचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी दराला चाप लावण्यासाठीही महत्वाचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला  असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सागितले.

     10 मे रोजी जालना शहराच्या हद्दीमध्ये संचारबंदी
      जिल्हाधिकारी रविंद बिनवडे यांचे आदेश जारी.
      

जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात लॉकडाउनमुळे  अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांना जालना जिल्ह्यातून उत्तरप्रदेश राज्यात विशेष श्रमिक ट्रेनने उद्या दि.10 मे 2020 रोजी पाठविण्यात येणार असून त्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(३) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून दि. 10 मे 2020 रोजी सकाळी 10:00 ते साय. 6:00 वाजेपर्यंत जालना शहरातील हद्दीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.  या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा, रुग्णालय, दवाखाने, औषधाची दुकाने, व उत्तर प्रदेश या राज्यातून मजूर किंवा कामगार ज्याना संबधीत तहसीलदार यांचे मार्फत ऑफलाईन पासेस निर्गमित केलेले आहेत या व्यक्ती तसेच अत्यावश्यक सेवेतील पास किंवा परवाना दिलेल्या व्यक्ती यांना सुट राहील.

हातभट्टीची दुचाकीवरुन वाहतूक

बीड :  गेवराई तालुक्यातील जातेगाव रोडवर एका दुचाकीवरुन हातभट्टीची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडील 60 लिटर हातभट्टी व दुचाकी जप्त करत दोघांवरही गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
गावठी दारु

      कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध घालण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुद्यप्त्या जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अशावेळी अवैध मद्य निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम राबविली आहे. आठ मे शनिवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बीड श्री शेख यांनी त्यांचे पथकासह गेवराई शहराच्या हद्दीत असलेले गेवराई-जातेगाव रोडवर संतोष अंकुश पवार (वय 32) व विकास साहेबराव राठोड वय 23 वर्षे दोन्ही राहणार कोल्हेर रोड गेवराई हे त्यांच्या दुचाकीवर प्लास्टिकचे कॅन वाहतूक करताना दिसून आले. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने त्यांना थांबवून त्यांच्याजवळील कॅनची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात 35 लिटर क्षमतेचे, 20 लिटर क्षमतेचे व 5 लिटर क्षमतेचे हातभट्टी दारूने भरलेले प्लास्टिक कॅन दिसून आले. ज्यात 60 लिटर हातभट्टी दारू अवैध विक्री करिता नेत असल्याचे आढळून आल्याने सदर दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड एम.ए शेख, जवान सांगुळे व वाहन चालक सुंदर्डे यांनी केली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...