शुक्रवार, २९ मे, २०२०


*सामाईक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून हाणामारीत / मारहाणीत ५५ वर्षे व्यक्तीचा मृत्यू


                                         अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना,खुनाचा गुन्हा दाखल.



अंबड़ प्रतिनिधि :-  अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना शेतातील सामायिक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून झालेल्या वादात पर्यावसान हाणामारी झाले. त्यामध्ये 4 जणांनी केलेल्या मारहाणीत एका 55 वर्षीय आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी ता 24 सायंकाळी पाच वाजता शहापूर तालुका अंबड येथे घडली. या प्रकरणी आज 4 जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर येथे गट नंबर 241 मध्ये शांताराम सुजनराव शिंदे यांनी बटाईने शेत केलेले असून या बटाईच्या  शेतात सामाईक बांधावर भोकरीचे झाड होते. या  झाडावरूनच शांताराम शिंदे व सोमनाथ भीमराव काळे, सोनू सोमनाथ काळे, कृष्णा सोमनाथ काळे, नवनाथ भिमराव काळे यांच्यात वाद झाला. आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यावेळी सोमनाथ काळे याने शांताराम शिंदे यांना कुऱ्हाडी च्या दांड्याने मारहाण केल्याने शांताराम शिंदे हे बेशुद्ध पडले ते बेशुद्ध पडताच सोनू काळे कृष्णा काळे व नवनाथ काळे या तिघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जागेवर टाकून पळ काढला सदर प्रकार दत्ता शिंदे यांना माहिती होताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन शांताराम शिंदे यांना उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पैत्रावर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके हे स्वत: पोलिस अधिक्षक साहेबांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला, वाढत्या अन्याय आत्याचाराला न्याय हा चळवळीच्या रेट्यामुळे मिळने हि बाब दुर्देवीच आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊंच्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. समाजीक न्याय मंत्र्यांनी अशा घटनेकडे लक्ष देण्याची मागणिही प्रसिद्धी माध्यमाव्दारे आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केली आहे. व कारके यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी उपस्थित सुरेश
 खरात, कचरू साळवे, तरंग कांबळे (बीड हॅलो रिपोर्टर महाराष्ट्र ब्युरो चिप), नीलेश जाधाव, अभिजीत शिरगोळे, राहुल कारके, अरविंद शीरगोळे (बीड हॅलो रिपोर्ट ता. प्रतिनिधि), कार्यकर्ते, पत्रकार टीम इत्यादि आदि उपस्थित होते. आदिवासी (मयत शांताराम शिंदे) यांच्या मुलाच्या म्हणजेच  दिगंबर शांताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून आखेर गोंदी पोलीस ठाण्यात खुनचा गुन्हा नोंद झाला. जातीवाचक शिवीगाळ,  भां.द.वी कलम 302, 323,504, 506, 34 ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगन हे करत आहे.
लाॅकडाऊन मुळे या वर्षी  माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाची गरज

       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे या वर्षी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर महाबीज निर्मित जया भाताचे बियाणे पेरणी साठी कोणाकडेच उपलब्ध नसल्याने या वर्षी आपल्या शेतात नेमके कोणते भाताचे बियाणे पेरावे या विचाराने माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

    रायगड जिल्हाला भाताचे कोठार असे संबोधले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड आणि माणगांव इत्यादी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतात मोठ्या प्रमाणात जया भाताचे पीक घेतात. कारण रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेनुसार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या जिल्ह्यातील उपरोक्त सर्व तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. आणि ते पुढील तीन ते चार महिने शेतात तसेच साचून राहते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आपापल्या शेतात लवकर तयार होणारे म्हणजे हळवे भाताचे बियाणे न पेरता जरा उशिरा तयार होणारे म्हणजे गरवे भाताचे बियाणे अर्थात जया या वाणाची निवड करून ते पेरतात.
     कारण जया या भाताला बाजारात विक्रीसाठी चांगला दर मिळतो. जया वगळता बाकी कोलम,रतना, आयरट,टायचण, सोना, कर्जत, इंद्रायणी इत्यादी सर्व प्रकारच्या भाताला बाजारात विक्री करताना अत्यल्प दर मिळतो. या शिवाय वरिल भाताचे पीक लवकर तयार होत असल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसामुळे वरील सर्व प्रकारची पीके कापण्यास विलंब होतो. आणि परिणामी लवकर तयार झालेले भात पावसामुळे वेळेवर कापायला न मिळाल्याने या भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाळ्या पुर्वी आपापल्या शेतात पेरणीसाठी जया या भाताची निवड करतात. परंतू सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट सेवेवर या चा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तमाम रायगड जिल्ह्यात या वर्षी  सर्व कृषी सेवा केंद्रावर जयाचे भात बियाणे उपलब्ध नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आपल्या शेतात या वर्षी नेमके कोणते बियाणे पेरावे या विवंचनेने चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अशी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.



                      ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम





ठाणे,ब्युरोचीफ दि.२९ :- कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत, अश्या लोकांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने तालुका, जिल्हा आणि शहरी भागात वार्डनुसार अन्नधान्याचे वाटप केले. ठाणे विभागात विठ्ठलवाडी, उल्हासनगर टिटवाळा,अंबरनाथ, कल्याण,आंबिवली , डोंबिवली या सारख्या अनेक भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. राज्यात लॉकडाऊन चालू झाल्यानंतर अनेकांचे काम बंद झाल्याने लोकांची उपासमार होऊ लागली. यावर उपाय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की गरीब, गरजू लोकांना मदत करा. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मदतीला सुरुवात केली. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागात मदत करण्यास सुरवात झाली. त्यात अन्नधान्यांचे किट, मास्क,पाण्याच्या बाटल्या तसेच  तयार केलेले जेवण इत्यादीचा समावेश होता. शिवाय मागेल त्याला ही मदत देण्यात येत होती. ठाणे जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ज्या लोकांनी फोन करून मदत मागितली होती. अश्या लोकांना घरपोच मदत करण्यात आली. त्यापैकी टिटवाळा येथील इंदिरानगर भागातून मदतीचा फोन आला होता, त्यानुसार वंचितच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे, वंचितचे कार्यकर्ते संतोष गायकवाड व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हूंबरे  यांनी टिटवाळा येथे जाऊन अनेक कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. तसेच विठ्ठलवाडी येथील श्रीराम कॉलनी, चिंचपाडा येथे सम्यक चे कार्यकर्ते गोपाळ गव्हाळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर जगताप  यांनी माया कांबळे यांना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यकर्त्यांनी ठाणे विभागात हजारो लोकांना सर्व प्रकारची मदत दिली असून अद्यापही ते काम चालू असल्याचे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे यांनी सांगितले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर या सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. विना बुंदिले, सुरेंद्र ठोके, ज्ञानदेव सुरवाडे, व्ही.डी. सपकाळे, उत्तम गवळी, प्रवीण गोसावी , रघुनाथ जाधव,सविता निकम,तायडे सर ,मेघराज येवले आणि विश्वविकास गायकवाड यांनी मदतीसाठी हातभार लावला. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे


अकोला,ब्युरोचीफ दि. २८ :- मास्कची विक्री करतो म्हणून लातूर येथील पत्रकार किशोर सोनकांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. लातूर येथील पत्रकार किशोर सोनकांबळे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने ते उदरनिर्वाहासाठी  मिळेल तो व्यवसाय करतात. सध्या कोरोनाच्या काळात मास्कची विक्री करून घरी जात असताना गांधी चौकात  सोनकांबळे यांना पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी  अडवून मास्क विक्री करण्यास विरोध केला. त्यावर सोनकांबळे यांनी आपण चुकीचे करत नसल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या हिबारेंनी सोनकांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हिबारे यांच्यावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल यांना सरकार मोफत राशन देणार आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांच्या वतीने मिसारवाडी मधील रहिवाशांना आव्हान.



राशन दुकान वर जास्तित जास्त फॉर्म भरून मिसारवाडी मधील रहिवाशांनी भरून दयावे.





औरंगाबाद,प्रतिनिधी :- औरंगाबाद मधील मिसारवाडी येथील शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांनी मिसारवाडी  वासियाना शिवसेना पक्षा तर्फे सूचित केली आहे की, ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल यांना सरकार मोफत राशन देणार,आप आपल्या भागातील राशन दुकानावर एक फॉर्म भरून देयचा आहे, आणि तो फॉर्म राशन दुकानावर भेटलं.त्यानंतर त्यांना मोफत राशन भेटणार आहे. जे गरजू असतील त्यांनी फॉर्म भरून द्यायचा आहे.
ज्यांच्याकडे  शिधापत्रिका (राशनकार्ड) नाही. त्यांनाही राशन दुकानातून मिळणार धान्य.त्यांच्याकरिता येणाऱ्या दोन दिवसात 31मे पर्यंत आपल्या जवळच्या राशन दुकानांमध्ये फॉर्म भरून दिल्यानंतर तो फॉर्म  पुरवठा अधिकाऱ्याकडून मंजूर झाल्यानंतर येणाऱ्या दहा तारखेपर्यंत त्यांना त्याच राशन दुकानातून धान्य उपलब्ध होणार आहे.व तसेच फॉर्म भरून राशन दुकानदाराकडे दिल्यानंतर त्याची पोहोच घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्वांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा.ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही असे आपले शेजारी नातेवाईक मित्र परिवारातील व्यक्ती किंवा कुटुंब त्यांना माहिती करून द्यावी .काही अडचण आल्यास मला संपर्क करावा.विक्क़ी लोखंडे शिवसेना उपविभाग प्रमुख मिसरवाडी  9764197829 यांनी सांगितले आहे.

गुरुवार, २८ मे, २०२०


                                         "वंचीत"च्‍या वतीने शेकडो  गरजुंना धान्‍य वाटप.
   


कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्‍या स्‍मृती दिना निमित्‍त वंचीत बहुजन आघाडीच्‍या वतीने शहरातील अंबड चौफुली , इंदिरा नगर ,संजय नगर ,चंदनझिरा आदि भागातील शेकडो गरंजुना धान्‍य वाटप करण्‍यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके ,नाभिक समाज विकास फाउंडेशनचे राजु वैदय ,गौरव संत ,विनोद मगरे ,भैय्‍यासाहेब पाखरे ,रूपेश अवसारे आदिंची उपस्‍थिती होती.
कोरोना महामारीतही आमच्या दलित आदिवासी बांधवांवर अत्याचार सुरूच - चंद्रकांत कारके

अंबड /अरविंद शिरगोळे :- केज तालुक्यातील मांगवडगाव येथील घटनेनंतर आज पुन्हा आमच्या आदिवासी महादेव कोळी जातीचे बांधव शांताराम शिंदे यांस शेतिच्या वादातून जातिय व्देषातून दगडाने व कुराडीच्या मागील बाजूने जबर मारहाण करून खून करण्याची अंबड तालुक्यातील शहापूर शेती शिवारात दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पैत्रावर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके हे स्वत: पोलिस अधिक्षक साहेबांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला, वाढत्या अन्याय आत्याचाराला न्याय हा चळवळीच्या रेट्यामुळे मिळने हि बाब दुर्देवीच आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊंच्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. समाजीक न्याय मंत्र्यांनी अशा घटनेकडे लक्ष देण्याची मागणिही प्रसिद्धी माध्यमाव्दारे आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...