शुक्रवार, २९ मे, २०२०




                      ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम





ठाणे,ब्युरोचीफ दि.२९ :- कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत, अश्या लोकांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने तालुका, जिल्हा आणि शहरी भागात वार्डनुसार अन्नधान्याचे वाटप केले. ठाणे विभागात विठ्ठलवाडी, उल्हासनगर टिटवाळा,अंबरनाथ, कल्याण,आंबिवली , डोंबिवली या सारख्या अनेक भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. राज्यात लॉकडाऊन चालू झाल्यानंतर अनेकांचे काम बंद झाल्याने लोकांची उपासमार होऊ लागली. यावर उपाय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की गरीब, गरजू लोकांना मदत करा. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मदतीला सुरुवात केली. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागात मदत करण्यास सुरवात झाली. त्यात अन्नधान्यांचे किट, मास्क,पाण्याच्या बाटल्या तसेच  तयार केलेले जेवण इत्यादीचा समावेश होता. शिवाय मागेल त्याला ही मदत देण्यात येत होती. ठाणे जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ज्या लोकांनी फोन करून मदत मागितली होती. अश्या लोकांना घरपोच मदत करण्यात आली. त्यापैकी टिटवाळा येथील इंदिरानगर भागातून मदतीचा फोन आला होता, त्यानुसार वंचितच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे, वंचितचे कार्यकर्ते संतोष गायकवाड व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हूंबरे  यांनी टिटवाळा येथे जाऊन अनेक कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. तसेच विठ्ठलवाडी येथील श्रीराम कॉलनी, चिंचपाडा येथे सम्यक चे कार्यकर्ते गोपाळ गव्हाळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर जगताप  यांनी माया कांबळे यांना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यकर्त्यांनी ठाणे विभागात हजारो लोकांना सर्व प्रकारची मदत दिली असून अद्यापही ते काम चालू असल्याचे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे यांनी सांगितले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर या सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. विना बुंदिले, सुरेंद्र ठोके, ज्ञानदेव सुरवाडे, व्ही.डी. सपकाळे, उत्तम गवळी, प्रवीण गोसावी , रघुनाथ जाधव,सविता निकम,तायडे सर ,मेघराज येवले आणि विश्वविकास गायकवाड यांनी मदतीसाठी हातभार लावला. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...