शुक्रवार, २९ मे, २०२०


*सामाईक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून हाणामारीत / मारहाणीत ५५ वर्षे व्यक्तीचा मृत्यू


                                         अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना,खुनाचा गुन्हा दाखल.



अंबड़ प्रतिनिधि :-  अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना शेतातील सामायिक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून झालेल्या वादात पर्यावसान हाणामारी झाले. त्यामध्ये 4 जणांनी केलेल्या मारहाणीत एका 55 वर्षीय आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी ता 24 सायंकाळी पाच वाजता शहापूर तालुका अंबड येथे घडली. या प्रकरणी आज 4 जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर येथे गट नंबर 241 मध्ये शांताराम सुजनराव शिंदे यांनी बटाईने शेत केलेले असून या बटाईच्या  शेतात सामाईक बांधावर भोकरीचे झाड होते. या  झाडावरूनच शांताराम शिंदे व सोमनाथ भीमराव काळे, सोनू सोमनाथ काळे, कृष्णा सोमनाथ काळे, नवनाथ भिमराव काळे यांच्यात वाद झाला. आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यावेळी सोमनाथ काळे याने शांताराम शिंदे यांना कुऱ्हाडी च्या दांड्याने मारहाण केल्याने शांताराम शिंदे हे बेशुद्ध पडले ते बेशुद्ध पडताच सोनू काळे कृष्णा काळे व नवनाथ काळे या तिघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जागेवर टाकून पळ काढला सदर प्रकार दत्ता शिंदे यांना माहिती होताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन शांताराम शिंदे यांना उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पैत्रावर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके हे स्वत: पोलिस अधिक्षक साहेबांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला, वाढत्या अन्याय आत्याचाराला न्याय हा चळवळीच्या रेट्यामुळे मिळने हि बाब दुर्देवीच आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊंच्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. समाजीक न्याय मंत्र्यांनी अशा घटनेकडे लक्ष देण्याची मागणिही प्रसिद्धी माध्यमाव्दारे आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केली आहे. व कारके यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी उपस्थित सुरेश
 खरात, कचरू साळवे, तरंग कांबळे (बीड हॅलो रिपोर्टर महाराष्ट्र ब्युरो चिप), नीलेश जाधाव, अभिजीत शिरगोळे, राहुल कारके, अरविंद शीरगोळे (बीड हॅलो रिपोर्ट ता. प्रतिनिधि), कार्यकर्ते, पत्रकार टीम इत्यादि आदि उपस्थित होते. आदिवासी (मयत शांताराम शिंदे) यांच्या मुलाच्या म्हणजेच  दिगंबर शांताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून आखेर गोंदी पोलीस ठाण्यात खुनचा गुन्हा नोंद झाला. जातीवाचक शिवीगाळ,  भां.द.वी कलम 302, 323,504, 506, 34 ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगन हे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...