शनिवार, २० जून, २०२०

कॉग्रेस पक्ष नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर - आ. गोरंट्याल

जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

जालना (प्रतिनिधी) :- जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटच्या वतीने शुक्रवारी रोजी कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे उद्धघाटन आणि अन्न पाकीट वाटप आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना येथे शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना अ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, कॉग्रेस पक्षाचा बलीदानाचा इतिहास आहे. देशाची अंखडता आणि राष्ट्रीय एकत्माता मंजबुत करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने देशाला धर्म निरपेक्ष विचार देवुन देशाची राज्यघटना आबाधीत ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा केली आहे. खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करुन कार्यकर्त्यानी भारतीय राज्य घटना देशात कायम टिकवीण्यासाठी ही एक रक्तदानातुन शपथ आहे. कॉग्रेस कार्यकर्ते समाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात हे आजच्या या रक्तदान शिबीरातुन उघड झाले आहे. असे ही आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर कॉग्रेस कमिटचे अध्यक्ष शेख महेमुद यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कॉग्रेस कमिटचे कार्याध्यक्ष राजेंद राख, प्रदेश सचिव विजय कामड, सत्सग मुंढे, बदर चाऊस, दिनकर घेवदे, आनंद लोंखडे, डॉ.विशाल धानुरे, एकबाल कुरेशी, तालुक्याध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठल सिंह राना, नगर सेवक विनोद रत्नपारखे, संदीप खरात, अरुन मगरे, शेख शकील, राजू पवार, गणेश चौधरी, दिलीप मोरे, विठ्ठल बापू डोंगरे, नासेर बेग, शहेनाज शेख, सय्यद निजाम, शिवराज जाधव, गणेश भालेराव, चंद्रकात रत्नपारखे, विजय लहाने, अरुण घडलिंग, संदीप वाघ, अंकुश गायकवाड आदी कायकर्ते उपस्थित होते.
यावेळी या रक्तदान शिबीरामध्ये कॉग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्योनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरा नंतर गरजुना अन्नाचे पाकीटवाटप करण्यात आले. श्री स्वामी ब्लड बँकेचे प्रकाश भागे, आंनद घाडगे, अनिकेत पाखरे, फ्रान्कीक कांबळे आदी कर्मचारी रक्तदान शिबीरामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलान गणेश चौधरी यांनी तर तालुक्यध्यक्ष वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत पाईकराव यांना दिली भेट                      


जालना,ब्युरोचीफ :- मच्छींद्रनाथ चिंचवली ता.घनसावंगी येथील तुळसिराम पाईकराव यांना गावगुंडांनी जातीय भावनेतून दोन हात निकामी होई पर्यंत जबर मारहाण  केल्या प्रकरणी दिनांक 20 जून रोजी जालना येथील शासकीय रुग्णालयात  वंचित बहुजनआघाडीचे पदाधिकारी  भिमराव दळे, दीपक डोके, विष्णु शेळके,बि.के.कारके,गनेश खरात, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे,राज रत्नपारखे यांच्यासह भेट दिली व वंचित बहुजन आघाडी पिडीत पाईकराव यांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भिमराव दळे," यांनी यावेळी सांगितले".

मागासवर्गीयांवरील हल्ले,कधी होणार कारवाई, वंचितच्यावतीने आंदोलनला सुरवात



मुंबई,ब्युरोचीफ :- राज्यातील मागासवर्गीयांवरील वाढते हल्ले पाहता प्रशासनाने अद्यापही ठोस पावले उचललेली नाहीत, राज्यभर निवेदने देऊन तीन दिवस झाले, मात्र कारवाई व योग्य तपासाला सुरुवात न झाल्याने वंचित बहुजन आघाडी अनुशक्तीनगर विभागाच्यावतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. मागासवर्गीयांनवरील हल्ले वाढत असून योग्य ती कारवाई केली जात नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरोपींना पाठीशी घालण्यात येत असून व योग्य ती कारवाई होत नसल्याने राज्यभर तीव्र आंदोलन करीत सरकार विरोधात निवेदन देण्यात आले होते. असे असतानाही अद्याप कारवाईला सुरुवात न झाल्याने किमान तशी घोषणाही न केल्याने वंचितच्यावतीने जाब विचारो आंदोलन करण्यात आले. अनुशक्तीनगर विभागाचे अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे,सुनीता डोळस, मकरंद कांबळे, कविता, दगडू साळवे,भाऊसाहेब जाधव, राणी अब्दुल्ले या कार्यकर्त्यानी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सरकारला जाब विचारला आहे. धर्मवादी, जातीयवादी असलेले हे सरकार जोपर्यंत निःपक्षपातीपणे कारवाई करायला सुरुवात करीत नाही, तोपर्यंत राज्यभर आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाईल,असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. 

शुक्रवार, १९ जून, २०२०

झोरे यांना उप अभियंता पदाचा पदभार देण्यास जि.प.प्रशासनाकडून टाळाटाळ.झोरे हे ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांना डावलले जाते - चंद्रकांत कारके



जालना / प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्रशासनात रिक्त पदाच्या पदोन्नती मध्ये सद्या मनमानी कारभार सुरू असुन जेष्ठता यादी डावलुन उप अभियंता पदाचे अतिरिक्त पदभार राजकीय दबावा पोटी दिल्या जात असल्याने व झोरे हे ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांना डावलले जात आहे असा आरोप करत या जि.प.च्या सर्व मनमानी कारभाराची वरीष्ठा मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील नेते तथा बहुजन भारत पार्टी चे महासचिव चंद्रकांतजी कारके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
        पुढे श्री कारके म्हणाले की, श्री.टि.डी.झोरे हे उच्च विद्या विभूषित बी.ई. ऐवजी एम.ई. उच्च शिक्षीत शाखा अभियंता असून यांची उप अभियंता पदाची सर्व शौक्षणिक पात्रता परिपुर्ण आहे.श्री. झोरे यांनी तसा विनंती अर्ज ही जालना जिल्हा परिषद प्रशासनाला कालमर्यादेच्या आत केला होता. मात्र राजकीय दबावा पोटी जाणीवपूर्वक त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी डावलले जात आहे. तेव्हा त्यांना जातीची आडकाठी न टाकता जेष्ठता यादी प्रमाणे उप अभियंता पदाचा तात्काळ पदभार देण्यात यावा. नसता जिल्हा परिषद प्रशासनाच्या रिक्त पद भरती प्रक्रियेच्या मनमानी कारभाराची मा. विभागीय आयुक्तांकडून तसेच मंत्रालयीन मा. सचिवांकडून चौकशीची मागणी करण्यात येईल. असे सांगत येणाऱ्या काळात सर्व ओबीसी .एस्सी. अभियंत्यांना सोबत घेऊन त्यांच्या हक्क व अधिकारासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेवटी चंद्रकांतजी कारके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

भारतीय जवानांना अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली


जालना,ब्युरोचीफ :- भारत-चीन सीमेवरील गवलान येथे चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरूवारी (ता.१८) जालना शहरात अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
   गांधी चमन येथे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना अखिल भारतीय सेनेचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख गणेश चांदोडे म्हणाले की, चीन भारताच्या सीमेवर कुरापती काढत आहे.कोरोनाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीनची जगभरात बदनामी होत आहे.भारतीय नागरिक चीनच्या वस्तुवर बहिष्कार घालत आहे.यामुळे चीनचे पित्त खवळले आहे.यामुळे चीनी सैनिकांनी भारतीय सेनेच्या जवानांवर हल्ला केला,यात २०जवान शहीद झाले आहेत.प्रत्येक भारतीय नागरिकाने चीनी वस्तूवर बहिष्कार टाकावा व चीनी वस्तूंची होळी केली तरच ती आपल्या भारतीय शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल.
   यावेळी अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्ष नंदा पवार, अखिल भारतीय सेनेचे जुना जालना विभाग प्रमुख अमोल रत्नपारखे , आदींची उपस्थिती होती.

नाभिक समाजासाठी ॲड प्रकाश आंबेडकर यांचा पुढाकार!


           जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; दुकाने न उघडू दिल्यास  आंदोलनाचा इशारा


अकोला,ब्युरोचीफ :- सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे परंतु केशकर्तनालय, ब्युटिपार्लर यांना मात्र परवानगी देण्यात आली नाही. यामुळे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाभिक समाजाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेउन जिल्ह्यातील केशकर्तनालय ब्युटी पार्लर  सुरू करण्यासाठी चर्चा केली. यावेळी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेने केशकर्तनालाय सुरू करण्याचा दिलेल्या परवानगीच्या धरतीवर अकोला जिल्ह्यातीलही सर्व केशकर्तनालय व ब्युटि पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी असे सुचविले.
नाभिक समाज या लॉकडाउनमुळे  विपन्नावस्थेत आला असून अकोट येथे उपासमारी व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या देखील झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर समस्येतून बाहेर पडण्यासाठी नाभिक समाजाला तात्काळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच तोपर्यंत नाभिक समाजातील लोकांना मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करावी  अशी आग्रही भुमिका ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली. अन्यथा लवकरच नाभिक समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय करतील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेण्यासंदर्भात मान्य केले. तसेच  याप्रसंगी बाळापूरमधील करोनाग्रस्त भागातील आरोग्य तपासणी करिता  वंचीततर्फे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस ऍड बाळासाहेब आंबेडकर व्यक्त केला. ज्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ प्रसन्नजित गवई, युवा नेता पराग गवई, नाभिक समाजाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर इंदुरकर, प्रशांत भातखडे, गजानन ओलोकार, संतोष पंडित, हरीहर पळसकर, गजानन येवतकर उपस्थित होते.


चीन देशाची मस्ती उतरविण्यासाठी हिंदुस्तानचे जवान सज्ज-माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर



भाजपाकडून चीन देशातील वस्तूची होळी करून व्यक्त केला निषेध 

जालना (प्रतिनिधी) :- चीन देशाची मस्ती उतरविण्यासाठी हिंदुस्तानचे जवान सज्ज झाले असून पाकिस्तान प्रमाणें चीन ला धडा शिकविल्याशिवाय हिंदुस्तानचे जवान शांत बसणार नसून भारतीययांनी आपल्या घरातील चीनी वस्तूची होळी करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा भाजपा नेते आ.बबनराव लोणीकर यांनी भाजपा जिल्हा कार्यालयासमोर चीन देशाचा निषेध व्यक्त करताना व्यक्त केला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसभापती भास्करराव पाटील दानवे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस बद्रीनाथ पठाडे, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, वीरेंद्र धोका, अतिक खान, बाबासाहेब कोलते, नारायण पवार, रवींद्र अग्रवाल, सचिन जाधव, अमोल कारंजेकर, सुभाष सले, सुनील पवार, संजय डोंगरे, प्रशांत आढावे, मोतीराम बेराड, दत्ता जाधव, संदीप भोसले, विठ्ठल नरवडे, तलरेजा आदि उपस्थित होते.  
शासनाच्या नियमाचे व सोशल डीस्टीगचे पालन करून यावेळी चीन विरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना आ.लोणीकर म्हणाले की, चीन सैनिकांनी आपल्या भारत देशाचे अगोदर २० सैनिक शहीद केले त्याचा बदला म्हणून भारतीय नवजवानांनी ४३ चीनी सैनिकांना ठार केले पाकिस्तान प्रमाणे चीनची मस्ती उतरविण्यासाठी भारताचे जवान सज्ज झाले असून यापुढे चीन देशाचे साहित्य मोबाईल व टेप रेकॉर्ड, टीव्ही व इतर साहित्याचा भारतीयांनी वापर न करता त्याची होळी करावी. भारतातील सर्व समाज बांधवांनी चीनी वस्तूवर यापुढे बहिष्कार टाकावा, चीन ने कोरोना सारखी महामारी जगभर पोहचवून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था संकटात आणली आहे, यापूर्वी पाकिस्ताननी भारतावर हल्ला केला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानला खंबीरपने धडा शिकविला त्याच प्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन ला धडा शिकाविल्याशिवाय राहणार नाही. चीन ला माज आणि मस्ती चढल्यामुळे त्याची मस्ती भारतीय सैनिक उतरविल्याशिवाय राहणार नाही असे हि माजी मंत्री आ.लोणीकर म्हणाले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...