गुरुवार, १२ मार्च, २०२०

अपंग निवासी विद्यालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत इको-फ्रेण्डली होळी साजरी करण्यात आली.
जालना/प्रतिनिधि :- ज्ञानज्योत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व अंजानी आई फाउंडेशन च्या वतिने जमना नंगर येथील अंपग
निवासी विधालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत ईको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा यानी होळीच्या शुभेच्छा देऊन होळी सन साजरा का करतात या बाबत माहीती दिली कि हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.अशी छोटी कथा सांगुन मुलाना सागितले कि होळी सुरक्षित होळी सांजरी करा
शक्यतो रंग वापरण्या पेक्षा फुलाने होळी साजरी करावी रंग खेळतानी,त्वचा,डोळे, याची काळजी घेउन ऊत्सव साजरा करा असे ज्योती आडेकर बोलत होत्या या कार्यक्रम ला ज्योती आडेकर,विधा जाधव,रूपाली पवार गौरव जाधव जावेद भाई,पवार सर व पदाधिकारी उपस्थित होते
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न.
मादळमोही | प्रतीनिधी. दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या प्रतिवर्षी मादळमोही कर अंखड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज पारायणाचे सात दिवस आयोजन करत आसतात या दरम्यान महाराष्ट्रातील प्राख्यात किर्तन काराचे किर्तन आणी प्रवचनाचे आयोजन  करण्यात आले होते.तर काल या नाम सप्ताहाची सांगाता श्रीक्षेत्र नारायण गड मठापती .ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत ह.भ.प संभाजी बाबा तुकाराम संस्थान मादळमोही यांच्या किर्तनाने झाली.
या सप्ताह सांगता प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्ता सह माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांच्या सुविद्य पत्नी सौ.गिरिका भाबी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गेवराई तालुक्यात मादळमोही येथे  4 मार्च रोजी श्रीक्षेत्र तुकाराम संस्थान येथे आंरभ झालेला अंखड हरीनाम सप्ताह या सप्ताहाची पंरपरा पार जुनी आसुन बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायण गडाच्या शुभ आशिर्वादाने सुरु आसणार्या सप्ताहात मादळमोही कर तन.मन.धनाने आपले लक्ष केंद्रित करुन ह.भ.प शिवाजी बाबाच्या आशिर्वादाने आणी ह.भ.प.संभाजी बाबा च्या सान्निध्यात हे आध्यात्म कार्य निर्विवाद पणे सुरु आहे.या सप्ताह दरम्यान ख्यातनाम किर्तन सेवा भाविक भक्ताना मंदिरात ऐकाला मिळत आसते तर येथील तरुणाचे फार मोठे योगदान या वेळी पाहायला मीळते प्रतेक वर्षी या अध्यात्मिक कार्यक्रमात मादळमोही चे तरुण रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यक्रम राबवतात .या वर्षी तर कोरोना सारख्या रोगाचा जो धुमाकूळ माजला आहे. त्या बाबत सुध्दा जनजागृती करण्यात आली आणी ।ह.भ.प.संभाजी बाबानी तर गावकर्याचे आसणारे संस्थानवरचे प्रेम हे खुपच अप्रतिम आसल्याचा उल्लेख करत 2021 नारळी सप्ताहाची पुर्व तयारी सुध्दा गावकर्यानी चांगल्या पैकी सुरु केल्याने शिवाजी बाबानी गावाचे कौतुक हि केले आहे.याच कार्यक्रमात पैठण ची नाथशेस्टी कोरोना व्हायरस मुळे रद्द करण्यात आली या मुळे येथील वारकऱ्यांची दिंडी निघणार नाही आशी घोषणाहि मादळमोही त करण्यात आली.

बुधवार, ११ मार्च, २०२०

शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
घनसांवगी प्रतिनिधी :- अाज दि.11/03/2020 वार बुधवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा, कुं. पिंपळगाव
 या शाळेत शालेय पोषण आहाराचा उदघाटन कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूर्ती  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके हे उपस्थित होते,तर उदघाटन म्हणून पंचायत समिती  घनसावंगी कार्यालयाचे शालेय पोषण आहार, अधीक्षक विलास काळे साहेब हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप चव्हाण, विनायक कदम  हिम्मतराव सोळंके व प्राचार्य ज्योती कोल्हे  हे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष,उदघाटन व प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती मातेच्या  प्रतिमेचे पुजन करून उदघाटन केले.त्यानंतर विद्यार्थी मनोगत घेण्यात अाले.तसेच शाळेतील शिक्षकांनी व प्रमुख पाहुण्यांनी शा. पो.आहारा विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.  तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक यांनी शिक्षणाबरोबर शालेय पोषण आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून पटवून दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन विजयकुमार काळे यांनी केले,तर अाभार दिपक सांगळे यांनी मानले.

सोमवार, ९ मार्च, २०२०


*                 विहामांडवा हिरडपुडी रोडची दुरुवस्था*
विहामांडवा /प्रतिनिधी (मोहम्मद शेख):- हिरडपुडी-विहामांडवा या रस्त्याची दुरवस्था झाली असून,हा रस्ता तत्काळ 
दुरुस्त करण्यात यावा,अशी मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे विहामांडवा व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.विहामांडवा ते हिरडपुडी रस्ता अत्यंत खराब झाला असून,या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे.रस्त्यावरुन चालणाऱ्या मुक्कामी बसगाड्या बंद झालेल्या आहेत.गेल्या ३५ वर्षात रस्त्याचे एकदाही पुर्ण करण्यात आलेले नाही.त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे,नसता १६ मार्च आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.या निवेदनावर विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर यांच्यासह अनेक व्यापारी व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.विहामांडवा ते हिरडपुडी या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची अशी दुरुवस्था झाली आहे.याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.


महिलांना समाजातील आपले स्थान दाखवण्याची गरज - अम्मारा
 महिला दिनानिमित्त जमाअते इस्लामी हिंद अंबड च्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे अयोजन
          अंबड ( प्रतिनिधी ) - महिला दिवस 8 मार्च निमित्त जमाअते इस्लामी हिंद अंबड कडुन जुनी तहसील शादीखाना
येथे दुपारी 2 ते 5 यावेळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला विंग अंबडच्या अध्यक्षा अनिस फातेमा तर प्रमुख वक्ते म्हणुन जालना महिला विंग शाखेचे शेख अम्मारा ह्या होत्या . शेख अम्मारा यांनी सभागृहात खचाखच भरलेल्या महिलानां उद्देशुन सांगीतले की , इतिहास साक्षीला आहे प्रत्येक परिवर्तानामध्ये महिलांनी महत्वाची भुमिका बजावलेली आहे . आणि त्यांनी आपल्या कुव्वतीन समाज परिवर्तन घडवुन अनलेला आहे . त्या साठी त्यांनी हजरत आयशा रजि . , जैनबुल गजाली , बिअम्मा या व्यतिरीक्त अलीकडच्या काळातील तमाम जिगरबाज , कर्तृत्वान महिलांचे उदाहरण दिले . आजच्या महिलांनी सुध्दा स्वतःला सक्षम व कर्तृत्वान बनवीने गरजेचे आहे . एक महिला ही आई , बहीन , मैत्रीन , पत्नी , मुलगी या सर्व नात्यांचा एक सुंदर गुंफन आहे . तीच्या पासुनच सुरुवात आहे आणि सुरुवातच नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे . त्यामुळे समाजाने महिलांचे स्थान लक्षात ठेवावे . तिला कमी लेखुन हिनवु नये . महिलांना उद्देशुन त्यांनी सांगीतले की , आपण आपली जबाबदारी ओळखने गरजेचे आहे . प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली आग्रेसर भूमिका असायला हवी . आपल्याला कागदोपत्री पदव्याचा गर्व आणि स्वार्थीपना वाढलेला आहे . स्वातत्र्यांच्या नावाखाली आपला सवैराचार वाढलेला आहे . आपले वाकडे पाऊल पडते कामा नये . फॅशनच्या नावाखाली आपली संस्कृती आपण विसरत चाललो आहोत . वडीलधारी व्यक्तीचे न । ऐकने , मनमानी करने , थोडेसे मनाविरुध्द झालेतर आत्महत्याचा मार्ग अवलंबने इत्यादी गोष्टीचे प्रमाण वाढलेले आहेत . काय इस्लामने आपणाला हिच शिकवन दिलेली आहे का ? इस्लामची शिकवन व इस्लाम मधील स्त्रीयांचे स्थान ह्या सर्व गोष्टी आपण विसरत चाललेलो आहोत . त्यामुळे सर्वात प्रथम आपण स्वतःला सिध्द करणे काळाची गरज आहे . शिक्षण कडे लक्ष देने , समाजातील वाईट चालीरिती बंद करणे , मुलींच्या हत्या , हंडाबळी , गर्भपात ह्या बंद होणे गरजेचे आहे . या सर्व बाबीवर अम्माराबाजी यांनी चौफेर फटकेबाजी केली . कार्यक्रमाच्या सुरुवात सय्यदा खिजर यांच्या कुरान पठणानी झाली तर सुत्रसंचलन नाफीया कुरेशी यांनी केले यावेळे तब्बसम जबीन , सारा फिरदोस , यांनी आपले विचार व्यक्त केले . या ठिकाणी समाजात चालीरितीवर छोटी - छोटी नाटके , ड्रामे , अॅक्शन साँग जि . आय . ओ . च्या वतीने सादर करण्यात आले . कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सारा फिरदोस , सबहात , आयशा , नाफीया , सालीहा , नाजीया इत्यादी ने परिश्रम घेतले .

रविवार, ८ मार्च, २०२०

त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगडधोंडे अंगावर झेलले म्हणून आज महिला उच्च पदावर-जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर
    जालना, (प्रतिनिधी)- आज महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतांना दिसतात.
याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी त्या काळामध्ये अत्यंत विपरित परिस्थितीत मुलींना शिक्षण देवून सुज्ञ केले व मुलींसाठी शिक्षणाचे दारे उघडी केली असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी बोलतांना केले.
ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती ज्योत माँ जिजाऊंचे स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळ असलेल्या नायगावकडे जाणाया ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी अंबेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अविनाश ठाकरे, माजी आमदार तोताराम कायंदे, सिंदखेडचे नगराध्यक्ष सतिश तायडे, जळगाव जामोदच्या नगराध्यक्षा स्वातीताई वाकीकर, स्मृतीज्योती समितीचे प्रमुख दिपक ठाकरे, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, संतोष खांडेभराड, संतोष जमधडे, संजय मेहेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन स्मृती ज्योत समिती सिंदखेड राजा व माळी कर्मचारी महासंघ बुलढाणा यांनी केले. पुढे बोलतांना अंबेकर म्हणाले की, ही ज्योत ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवास करणार आहे. त्या-त्या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार नेणार असल्याचे सांगितले. तसेच पुरुषांनी आपली मानसिकता बदलल्यास ५० टक्क्यांने असलेल्या महिला समाजाला खNया अर्थाने पुढे जाता येणार आहे. तसेच बुध्दीमत्तेने महिला या पुरुषांच्या मानाने काकण भर सरसच असतात. परंतु दुर्देवाने समाजात त्यांना त्यांचे कर्तुत्व सिध्द करण्याची पुरेशी संधीच मिळत नाही. शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाचा, व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. समाजात परिवर्तन होवू शकत नाही, हे त्या काळात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांनी ओळखले व समाजाचा तीव्र विरोध झुगारुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित करुन त्यांनी स्त्रीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्री सृष्टी निर्माण करण्यात यावी, या मागणीसाठी दिपक ठाकरे व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.
यावेळी माळी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या औचित्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बहुजन समाज पार्टी च्या आठ पदाधिकारीऱ्या ने दिला राजीनामा.आमची नाराजगी पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या वर नाही.मात्र त्याच्या हाताखाली कमकरणाऱ्या यक्ती हे मायावती यांच्या विविध बाबीच्या संदर्भात दिशाभूल करत आहे.
          अंबड़ /प्रतिनिधि* : बहुजन समाजवादी पार्टी महाराष्ट्रात वाढवी म्हणून सर्व समाजातील केडर बेसच्या लाकोंना जिल्हाध्यक्षपदी
काम करण्याची संधी मिळावी, असे सांगूनही पक्षात काहिच बदल होते नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आठ पदधिकारी बहुजन समाज पार्टीच्या सदस्यत्वचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजणे त्यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. व्यंकटेश कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही गेल्या 22   वर्षापसुन बहुजन समाजवादी पार्टीसाठी काम करत होतो. आजही बासपसाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमची नाराजगी पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या वर नाही. मात्र त्यांच्या हताखाली काम करणाऱ्या व्यक्ति मायावती यांच्या विविध बाबीच्या संदर्भाने दिशाभूल करत आहेत. त्यामुळे आजचा प्रसंग घडला आहे. पक्षाचे धोरण महाराष्ट्रासाठी नसल्याचे दिसून येत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...