रविवार, १५ मार्च, २०२०

बहुजन समाज पार्टी जालणाच्या वतीने मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जालना प्रतिनिधी :- जालना शहरातील येथील बहुजन समाज
पक्षाच्या जालना जिल्हाच्या वतीने मान्यवर काशिराम साहेब यांची 86 वी जयंती फोटोला हार घातलून मस्तगड येथे साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हा पदाधिकारी उपस्थित जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे,जिल्हासचिव ज्ञानेश्वर गरबडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विवेक दहीवाळ,
जिल्हाबिव्हीएफ,रंजीत हिवाळे,संजय खरात,पेंटर खरात साहेब,आढावे बाबा,जाधव साहेब, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्याच्या अध्यक्षपदी महेंद्र बनकर तर सचिवपदी मनोहर उघडे यांची निवड.
जालना (प्रतिनिधी):- गेल्या 42 वर्षाची परंपरा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2020 च्या  अध्यक्षपदी रेल्वे कर्मचारी तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध 
निवड करण्यात आली तर सचिव पदी मनोहर उघड यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्राम गृह जालना येथे आयोजीत एका बैठकीत ही निवड कण्यात आली आहे.जालना शहरात गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरु आहे. या व्याख्यानमालेस नामवंत साहित्यिकांसह मान्यवरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाची मेजवाणी जालनेकर श्रोत्यांना व्याख्यान मालेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येत असते.त्यानुशंगाने दि. 15 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बी.एम. साळवे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर सेठ रत्नापारखे, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, एन.डी. गायकवाड, व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष अरुन मगरे, माजी सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. सदर बैठकीत माजी सचिव सुहास साळवे यांनी 2019 चा हिशोब सादर केला. मागील व्याख्यानमालेचा हिशोब सर्वानुमते मान्य करण्यात आला. यावेळी संजय हेरकर, अनुराधा हेरकर, फकीरा वाघ, महेंद्र रत्नपारखे,  विलास रत्नपारखे, कैलास बनसोडे, महेंद्र बनकर, सुनिलभाऊ साळवे, बबनराव रत्नपारखे, पप्पू चत्रे, सिध्दार्थ के. मोरे, रनजीत रत्नपारखे, सुनिल बनकर,  मनोहर उघडे, परमेश्वर उघडे, सुहास साळवे, जे.एस. कीर्तीशाही, विजय कांबळे, योगेश रत्नपारखे, सचिन कांबळे, अशोक रगडे,  शिवाजी सहारे, दिपक डोके, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, कपील खरात, सतिष वाहुळे, संदीप साबळे,  मिलींद बोर्डे, किशोर जाधव, राहुल वाहुळे, प्रकाश हिवाळे, प्रकाश मोरे, विलास भिंगारे, तेजराव खरात, सुधाकर मोरे, सुनिल साळवे, अमित साळवे, करण सदावर्ते, राहुल रत्नपारखे, प्रमोद म्हस्के, प्रमे जाधव, एस.एस. कांबळे, माधवराव पात्रे, मंगलदास बागुल, डी.आर. धामने, जयसेन बनकर, राहुल धिवार, अर्जुन जाधव, आत्माराम यादव, बाळु बोर्डे, सर्जेराव खरात, गौतम वाघमारे, नितीन गोदाम, संघदीप कुलतर्खे, सिमोन सुतार,  तेजराव मोरे, सुनिल रत्नपारखे, राजेंद्र जाधव, अशोक लबडे, मधुकर बोबडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
         जगदंबा इंग्लिश स्कूलमध्ये कोरोणाविषयी जनजागृती प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांनी कोरोणापासून बचाव ची केली तयारी.
विहामांडवा (प्रतिनिधी) मोहम्मद शेख :-:पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी
व शिक्षकांनी कोरोना वायरस पासून बचावासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता मुलांनी कोरणा विषयी माहिती देऊन कोरोना आजार टाळण्यासाठी प्रत्यक्षात केले जाणाऱ्या उपयोग उपाय योजनेचे प्रात्यक्षित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोना वायरस चे लक्षणे, डोकेदुखी, सर्दी व खोकला, श्वसनाचे त्रास, किडनी फेल, ताप व त्यापासून बचावासाठी साबण व पाण्याने स्वच्छ हात धुणे, शिंकताना रुमालाचा वापर करणे, सर्दी व खोकला झालेले व्यक्तीपासून दूर राहणे व तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरणे, त्याच प्रमाणे हस्तांदोलन टाळणे, रुमाला पासुन मास्क तयार करणे, एकमेकात सुरक्षित अंतर ठेवणे व जमिनीवर मातीत खेळल्यानंतर  साबणाने स्वच्छ धुणे या कोरोना पासून बचावाच्या गोष्टी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचप्रमाणे शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला व कोरोना नावाची मानवी साखळी तयार करत पुराणापासून बचाव करणे करण्यासाठी लागणाऱ्या उपायोजना व घोषना देत जनजागृती केली. यावेळी शाळेचे सचिव प्रशांत नरके हे उपस्थित होते उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका प्रियंका थोटे पर्यवेक्षिका मयुरी खोबरे,संतोष रखे,कल्याणी कुलकर्णी,संतोष बांगर, मोनिका बोडके,अविनाश बांगर,प्रगती पहाडे, संदीप बर्वे,वैष्णवी देशमाने, ऐश्वर्या जाधव,सुंदर थोरे,जयश्री डिक्कर हे प्रयत्न करत आहेत.

शनिवार, १४ मार्च, २०२०

मातंग समाज संघ वतीने औंरंगाबाद येथे बैठकिचे आयोजन.
औरंगाबाद /प्रतिनिधी :- मातंग समाज संघ वतीने बैठक चे बैठक 
 मातंग समाज संघ चे संस्थापक अध्यक्ष मा.एडवोकेट गायकवाड साहेब यांच्या आदेशाने घेण्यात आली.हया बैठकीत खालील विषय चर्चा करण्यात आली.1) पुढील मिटिंग सर्वांना सोईस्कर रविवार या सुट्टीच्या दिवशीच घ्यावी (2)वधुवर परिचय मेळावा चे नियोजन करणे (3) बचत गट स्थापण करून बचत गटाचला आर्थिक बळकटी देणे (4)इयत्ता दहावी आणि बारावी साठी परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे (5) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सरकारी योजना बाबत मार्गदर्शन करणे. मिटिंग मधे मा श्री अरुण आव्हाड साहेब(औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष)मा श्री सिध्दांत कांबळे साहेब (औरंगाबाद जिल्हा प्रभारी) मा श्री प्रभाकर पोळ साहेब (औरंगाबाद शहर अध्यक्ष) मा सौ सविता ताई गायकवाड (औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा) तसेच  मा संतोष नाडे साहेब हे उपस्तिथ होते.मातंग समाज संघ- औरंगाबाद




श्री साईबाबांच्या पदकमलाने  तसेच वास्तव्याने पावन झालेल्या  सर्वप्रथम साईभक्त चांद पटेलांची कर्म  भूमी धुपखेडा वरून प्रसिद्ध होणाऱ्या "श्री साईबाबा सेवा  साधना आश्रम" संचलित "साई संस्कार "मासिके च्या वतीने मान्यवरांच्याा उपस्थितीत मा.श्री.ए.के डोंगरे (आय ए एस) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून -श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिरडी) नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच   श्री साईबाबा सेवा साधना आश्रम धुपखेडालाही भेटीचे  निमंत्रण  देण्यात आले या वेेेेळी साई संस्कार या मासिकाचे कार्यकारी संपादक : हिराजी कारके,साई भक्त वेदांत कांबळे, श्री. दशरथ तुपे ( नगरसेवक ),पत्रकार श्री किरण वाबळे इत्यादी उपस्थित होते

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

अंबड़ शहरात दुप्पट सोने करणाऱ्या  भामट्याच्या चोरांना गजा आड़
दुप्पट सोने करुण देतो असे म्हणत ऐका महिलेच्या हातात धातु देऊन फवनुक.
अंबड | अरविंद शिरगोळे दुप्पट सोने करुण देतो असे म्हणत ऐका महिलेच्या हातात धातु देऊन फवनुक तो  सोन्याचा आहे असे सांगून महिलेच्या अंगावरील सोन्याच्या पोतीवर आज दि.12 मार्च रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास अंबड बस स्थानक गेट नंबर दोन मध्ये हात साफ करुन फसवणूक करणाऱ्या भामटयाच्या चोरला तात्काळ अंबड पोलीसांनी आवळुन त्यास गजाआड केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील राहणारी महिला नामे शोभाबाई बनन पवळ वय 47 वर्ष ही तिच्या पाहुणीच्या लग्नाला निकळंक ता.बदनापुर येथे जाण्यासाठी धाकलगाव येथून खाजगी रिक्षात अंबड पर्यंत आली. व बस स्थानक गेट नं. 2 मधुन पायी आत जात असताना तिच्या पाठी मागुन दोन अज्ञात भामटे तिच्या जवळ गेले. व तीच्या हातात सोनेरी रंगाचा धातु देऊन तो सोन्याचा आहे असे दाखवुन तिच्या गळयात 50 सोन्याचे मनी व दोन डोरले अशी असलेली पोत जिची किमत 15 हजाराची अशी दुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून ती काढून घेतली. तेव्हा सदर महिलेस सोने म्हणून देण्यात आलेला धातु तिने इतर लोकांना दाखविले असता तो सोन्याचा नसुन धातु असल्याचे तिला सांगितल्याने तिची फसवणुक झाल्याचे तिला समजले. सदर घटणेची माहिती अंबड पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांनी तपासाचे चक्र फिरवून पो.उप.नि.सुग्रीव चाटे, जमादार विष्णु चव्हाण,पोलास कॉन्सटेबल वंदन पवार,संतोष वनवे यांना माहिती काढणे करीता शहरात रवाना केले. त्यांनी गुप्तबातमीदारामार्फत माहिती काढुन फसवणुक करणारा भामटा बंडु लक्ष्मण जाधव रा.बीड ता.जि.बीड यास शहरातील आठवडी बाजारातुन  त्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन अंबड येथे आणून त्यास विचारपुस केली असता तो पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी अंबड पोलीसात शोभाबाई भ.बबन पवळ वय 47 वर्ष धाकलगांव ता.अंबड जि.जालना हिच्या फिर्यादवरुन कलम 420,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करीत आहेत.

गुरुवार, १२ मार्च, २०२०

अपंग निवासी विद्यालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत इको-फ्रेण्डली होळी साजरी करण्यात आली.
जालना/प्रतिनिधि :- ज्ञानज्योत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व अंजानी आई फाउंडेशन च्या वतिने जमना नंगर येथील अंपग
निवासी विधालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत ईको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा यानी होळीच्या शुभेच्छा देऊन होळी सन साजरा का करतात या बाबत माहीती दिली कि हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.अशी छोटी कथा सांगुन मुलाना सागितले कि होळी सुरक्षित होळी सांजरी करा
शक्यतो रंग वापरण्या पेक्षा फुलाने होळी साजरी करावी रंग खेळतानी,त्वचा,डोळे, याची काळजी घेउन ऊत्सव साजरा करा असे ज्योती आडेकर बोलत होत्या या कार्यक्रम ला ज्योती आडेकर,विधा जाधव,रूपाली पवार गौरव जाधव जावेद भाई,पवार सर व पदाधिकारी उपस्थित होते

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...