रविवार, ५ एप्रिल, २०२०

               आपत्कालीन परिस्थितीत काम करणा-या 
                       कर्मचा-यांना बिस्कीट पुडे वाटप
जालना, प्रतिनिधी - कोरोना विषाणुच संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात
पण आहे. याबाबत राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण  तथा पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 मार्च 2020  रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जालना येथे बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या सुचनेनुसार सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना ब्रिटानिया बिस्कीट प्रा. लिमीटेड कंमनी, मुंबई यांच्याकडुन एकुण 40 हजार 104 बिस्किट पुडे प्राप्त झाले असून अत्यावश्यक सेवा देणा-या  कार्यालयांना बिस्किटांचे  पुढीप्रमाणे वाटप करण्यात आले. पोलीस विभाग जालना  1000 बिस्किट पुडे, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना 1000 बिस्किट पुडे, जिल्हा शल्य चिकित्सक जालना 5000 बिस्किट पुडे,  नगर परिषद जालना 5000 बिस्किट पुडे, इंडस प्रकल्प जालना 5000 बिस्किट पुडे, आपत्ती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना 5 हजार 104 बिस्किट पुडे अशाप्रमाणे  बिस्किट पुड्यांचे  वाटप करण्यात आलेले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी जालना यांनी कळविले.
   शहागड येथील 26 नागरिक खबरदारीची  उपाययोजना म्हणुन            सामान्य रुग्णालय  जालना येथे तपासणीसाठी भरती.
जालना, प्रतिनिधी – निलंगा शहरात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत व्यक्ती यांच्या प्रवास इतिहासात 
त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये दि.5 एप्रिल 2020 रोजी 29  रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात  दाखल होते. त्यापैकी 176 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 140 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले आहेत व 3 नमुने रिजेक्ट असुन 33 नमुन्यांची अहवाल प्रलंबित आहे.आज रोजी 70 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन 70 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 128 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 121 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर  शहरे व राज्यातुन आलेल्या 15 हजार 842 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या 124 असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 47, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 39, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 38 जणांना दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी  व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे चहा पाणी करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या शहागड येथील 26 नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणुन सामान्य रुग्णालय जालना येथे तपासणीसाठी आणण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या सर्व 26 व्यक्तींना जिल्हा सामान्य  रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

 लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे -                                                केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, प्रतिनिधी - लोकडाऊनमुळे सर्व  गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे; 
सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी  त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे तसेच पुढील 4 महिने  थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना ना रामदास आठवले यांनी विजकंपन्यांना केली आहे. मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी ने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिके ने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. वीजबिल माफ करण्यासोबत कोरोना ची चाचणी मोफत करावी किंवा अल्प दरात करण्यात यावी .सध्या कोरोना चाचणी साठी 5 हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्या ऐवजी मोफत किंवा  रु.500 एव्हढया अल्पदरात कोरोना चाचणी करावी अशी आपली मागणी असून याबाबत लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्स यांनाही कोरोना चे  किट उपलब्ध करून दिले पाहिजे. पुरेश्या सुविधा नर्सेस ला ही दिल्या पाहिजेत. तसेच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. कोरोना ला घाबरुन जर खाजगी डॉक्टर घरी बसले तर कोरोनाशी लढा कसा जिंकणार? असा सवाल ना रामदास आठवले यांनी केला असून खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू कारण्याचे आवाहन ना रामदास आठवले  यांनी केले आहे.
रिपब्लिकन कार्यकर्ते विविध ठिकाणी मदत करीत आहेत त्यांनी रक्तदान करण्यासाठी ही पुढे आले पाहिजे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले.

                
         कोरोना अलर्ट :  जिल्ह्यात आज प्राप्त 10 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’
               संस्थात्मक विलगीकरणात 14 नागरिकांची वाढ
                       अलगीकरणात 5 संशयीत दाखल
बुलडाणा, प्रतिनिधी :  जिल्ह्यातून शेगांव, खामगांव व बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात
दाखल संशयीत व्यक्तींचे तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या संशयीत 17 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 16 संशयीतांचे नमुने पाठविण्यात आले आहे. अशाप्रकारे 33 संशयीत नागरिकांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी आज 10 नमुन्यांचे रिपोर्ट प्रात्प झाले असून ते निगेटीव्ह आहेत.  जिल्ह्यात दिल्ली येथील कार्यक्रमातून परतलेल्या 17 व त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 संशयीत व्यक्तींच्या  नमुन्यांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे. 
घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या  नागरिकांमध्ये आज  भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. काल दि. 3 एप्रिल 2020 पर्यंत 76 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलीगकरणातील नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 76 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज 14  व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज मुक्तता करण्यात आलेली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 36 नागरिक आहेत.
जिल्ह्यात आज बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 2, शेगांव 2 व खामगांव येथे 1 संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे 5 संशयीतांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 17 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 4, शेगांव 4 व बुलडाणा 9 व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 48 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर  आजपर्यंत 61 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 17 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 18 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 11 व खामगांव येथील 7 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 86 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 63 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 पॉझीटीव्ह व  58  निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत.  तसेच 23 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.                                    

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

      कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना                                   मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  मुंबई प्रतिनिधी : कृपा करून शिस्त
पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून  म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत.. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू,माता-भगिनी आणि  महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर  अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.
प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या 7 वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा  आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.
एकजुटीला गालबोट लावू देणार नाही
कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच
राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत.ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही.
इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा
हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा. संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
दिल्लीहून परतलेल्या १०० टक्के लोकांचा शोध आणि विलगीकरण
परवा प्रधानमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीतील कार्यक्रम करून घरी परतलेल्या लोकांची माहिती देणारी यादी दररोज केंद्रशासन आपल्याला पाठवत आहे. आतापर्यंत कळवलेल्या जवळपास १०० टक्के लोकांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम आपण केले आहे. परंतू जर यातील कुणी शोधायचे राहिले असतील तर त्यानी स्वत:हून पुढे यावे, चाचणी करून घेऊन उपचार करून घ्यावेत, किंवा शेजारच्या नागरिकांनी अशा लोकांची माहिती द्यावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.
५१ लोक सुखरुप घरी गेले
राज्यात कोरोना बाधितांच्या केसेस वाढताहेत, मला ही माहिती लपवायची नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण महाराष्ट्रात आणि मुंबईत चाचणीची केंद्रे वाढवली आहेत. आपल्याकडे येऊन तपासणी करून घेणाऱ्यांपेक्षा आपण स्वत:हून पुढे जाऊन संशयितांचा शोध घेत आहोत. आज या रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे पण ५१ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप गेले आहेत याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
राज्यात ५ लाख स्थलांतरीतांची सोय
इतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार-मजुरांची महाराष्ट्र शासनाने जबाबदारी घेतली असून जवळपास ५ लाख लोकांची सोय केली आहे. त्यांच्या दोन वेळेसचे जेवण, नाश्ता, राहण्याची आणि औषधोपचाराची मोफत सोय केली आहे. त्यामुळे कुणी कुठेही जायची गरज नाही हे ही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रीयन माणसांनाही त्यांनी दिलासा दिला. आहे तिथेच रहा हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करा असे आवाहन करून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.
मुंबईकरांची एकजुट आणि जिद्द अतुलनीय
जिल्ह्याजिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सगळ्या जगाचे जसे मुंबईकडे लक्ष आहे तसेच विषाणुचेही. पण ही मुंबई आहे, या शहराने अनेक धक्के आणि अपघात पचवले आहेत. त्यांचे शौर्य नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एकजुट आणि जिद्द हा या शहराचा स्थायीभाव आहे. या मुंबईचे  हा विषाणु काही बिघडवणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत कोविड-१९ साठी स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत. सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत.
ज्येष्ठांना जपा
दुर्देवाने काही मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, मधुमेह, ह्दयविकार आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्याचा या मृत्यूत समावेश आहे. आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना विषाणुचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण सुरक्षित राहणे, गर्दीत,घराबाहेर न जाणे हा एक उपाय आहे. जेंव्हा केंव्हा जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जाऊ तेंव्हा नाक, चेहऱ्याला रुमाल बांधून जाऊ यासारखा साधा उपायही आपल्यालाच करायचा आहे.
जीवनावश्यक वस्तुंची २४ तास उपलब्धता असतांना गर्दी का करता असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जनतेस विचारला तसेच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तुम्ही अंतर ठेऊन वागाल तर कोरोनाचा धोका ही तुमच्यापासून दूर राहील.  माझा माझ्या राज्यातील जनतेवर विश्वास आहे. माझ्या मनात आत्मविश्वास आहे. याबळावर एकजुटीने आपण कोरोनावर मात करू, संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची ही भिंत मनात अशीच मजबूत ठेवा, कोरोना तुमचं काही ही बिघडवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले तसेच या लढाईत आपणच जिंकणार हा विश्वास देखील व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मदत करणाऱ्या सर्व हातांचे आभार व्यक्त केले .


...    
जालन्यात भाजपाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपासाठी हजारोची गर्दी ची लाट भाजपच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा फज्जा
जालना / प्रतिनिधी :-जालना शहरातील समभाजीनगर येथे गरिबांसाठी किराणा किट वाटप 
करण्यात येणार होती हे धान्य भाजपा कार्यालय येथे देण्यात येणार होती. मात्र धान्य वाटप करण्यासाठी नागरिकांना कार्यालयातच बोलवण्यात आलेले होते.देश भरात लोकडाऊन सचारबंदी सुरू आहे 144 कलम लागू असताना सुद्धा याठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांना एकत्र धान्य वाटण्यात येणार होते.शासन हे सर्वत्र गर्दी होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्स ठेवावे म्हणून विविध उपाययोजना करत आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.शासन हे कठोर पाऊलही काही ठिकाणी उचलत असल्याचे दिसते.विविध संस्था व काही नगरसेवकांनी अन्न धान्य वाटप केलेले आहे परंतू त्यांनी घरपोच वाटप केले.यामुळे गर्दी होण्यास टाळलेले आहे.जालना भाजपा तर्फे ही आज रोजी अन्न धान्य वाटप करण्यात येणार होते परंतू त्यांनी घरपोच न देता सर्वांना कार्यालयातूनच घेऊन जाण्याचे सांगितले.यामुळे परिसरातील नागरिकांची एकच झुंबड उडाली सचारबंदी चे उल्लंघन केले आहे.जालन्यात भाजपच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे.जालन्यात भाजपच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा फज्जा पाहायला मिळाला.लाॅकडाऊन दरम्यान अनेकांवर उपासमरीची वेळ आली.त्यामुळं जालना शहरातल्या भाजप कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गरिबांना धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजन्यात आला होता.मात्र मोफत धान्य मिळणार असल्यानं नगरिकांनी याठिकाणी प्रचंड गर्दी केली.भाजपच्या वतीनं याठिकाणी नागरिकांना थांबण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलं नव्हतं. प्रचंड गर्दी केल्यानं पोलिसांच्या मदतीनं नागरिकांना हकलवण्यात आलं.त्यामुळं शेकडो नगरिकांना याठिकाणाहून रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र भाजपच्या नियोजन शून्यतेमुळं कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं.या भाजपा कर्यालयासमोर गर्दीची लाट उसळली सदरची ही बाब पाहता अज्ञान व्यक्तीने पोलिसांना फोन केले तेव्हा सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तातडीने या ठिकाणी पाचारण झाले व होणारी गर्दी ही रिकामी केली.व पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना चांगलेच बजावले.

                147 पैकी 111 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
            3 नमुने रिजेक्ट तर 33 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित
जालना, प्रतिनिधी - कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) 
प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग  जालना जिल्ह्यामध्ये दि.4 एप्रिल 2020 रोजी 21  रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात  दाखल होते. त्यापैकी 147 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 111 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले आहेत व 3 नमुने रिजेक्ट असुन 33 नमुन्यांची अहवाल प्रलंबित आहे.आज रोजी 43 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन 42 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व एका रुग्णांची   प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत. सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगलीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 122 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 115 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर  शहरे व राज्यातुन आलेल्या 15 हजार 458 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या 124 असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 47, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 39, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 38 जणांना दाखल करण्यात आलेले आहे. प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी  व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.  दरम्यान  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे  यांनी कोरोना विषाणु संबंधित सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत यांची आढावा बैठक घेऊन संशयीत रुग्ण व त्यांच्या सहवाशितांची स्थानिक आरोग्य पथकांमार्फत तपासणी करुन लक्षणानुसार अलगलीकरण किंवा विलगीकरणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देत सर्व सहवाशितांचा किमान 14 दिवस पाठपुरावा करण्यात यावा. या दृष्टीने कार्यक्षेत्राचा कृतिक्षेत्राचा कृति आराखड्याची रंगीत तालिम घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...