मंगळवार, २८ जुलै, २०२०
अंबड,प्रतिनिधी :- में कलाठिया इंजीनियरिंग ऐंड कंस्ट्रक्शन ली.अहमदाबाद गुजरात या कंपनीस पाचोड-अंबड,घनसावंगी, आष्टी रसत्याच्या कामा करिता दगड या गौण खनिजाच्या 7000 ब्रास इतक्या मर्यादा व वाहतुकीसाठी अल्प मुदतीचा तातपुरता खांनपट्टा परवाना दिलेला होता.त्याची काढण्याची मुदत दि.5/6/2020 पासून ते मुदत दि.20/6/2020 पर्यंत सम्पात होत आहे.सदरिल खान ही मौजे वलखेड़ा गट न.25 आणि 31मध्ये परवानगी देण्यात आली.दगड काढण्याची मुदत समाप्त होऊन एक महीना उलटला तरी देखील उत्खनन सुरुच आहे.
कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन.
अकोला,ब्युरो चीफ :- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे काल दुःखद निधन झाले.
वंचित बहुजनांचा आवाज समजल्या जाणाऱ्या तसेच सातत्याने कोळी समाजाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देणाऱ्या सुमन ताई कोळी यांचे दुःखद निधन झाले. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सोमवार, २७ जुलै, २०२०
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
रविवार, २८ जून, २०२०
जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा 02, संभाजी नगर 02, रामनगर विनकर कॉलनी 01, नरिमननगर 01,रहेमान गंज 01,आनंदनगर 03, समर्थनगर02, लक्कडकोट04,खडकपुरा 03 अशा एकुण 19 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नळगल्ली 01, संजोग नगर 01, क्रांती नगर 01,यशोधरा नगर 01, खडकपुरा 05,अंबड रोड जालना 01, मंगळबाजार 02,रहेमान गंज 15, योगेश नगर 01, सत्यनारायण चाळ 01,मस्तगड 01,दानाबाजार 10,पानशेंद्रा ता. जालना येथील 01,भारज बु ता जाफ्राबाद येथील 01, अशा एकूण 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4012 असुन सध्या रुग्णालयात-130,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1563, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–46, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5063 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–42 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-504, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4503 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-52, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1420.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती –1255, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-33, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-213, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-19, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-336, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-142 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13087, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.आजसंस्थासत्मवक अलगीकरणात असलेल्या0 व्यखक्तींबची संख्या 213 असून /संस्थारनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना_03,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-13,मॉडेल स्कूल परतुर-10,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-16,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-17,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 20,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय महविद्यालय जाफ्राबाद 12.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 888 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 4 लाख 49 हजार 530 असा एकुण 4 लाख 76 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी
जालना,ब्युरोचीफ :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायययोजना नियम 2020 मधील तरतुदीनुसार जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरिकांची वाहतुक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...







