रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

           क्रांतिगुरूचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
 बुलढाण्यात संपन्न नारायण माहोरे रामदास आमले व गंगाधर वानोळे पुरस्काराने सन्मानित.

सिंधीकाळेगाव,२१ ( प्रतिनिधी)  :- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा गेल्या दहा वर्षापासून बुलडाण्यातील
क्रांतिगुरू संस्था करीत आहे. यावर्षी नारायण माहोरे,गंगाधर वानोळे व रामदास आमले यांची निवड करून त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.
      शैक्षणिक व सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध कार्य  केल्याबद्दल गंगाधर वानोळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, रामदास आमले यांना राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार तर नारायण माहोरे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      बुलडाणा जिल्ह्यातील क्रांतिगुरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार,दि.२० रोजी बुलडाण्यातील गुंधा येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा प्राचार्य भाऊसाहेब झोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बोरकर,ल.स.क.म.चे विदर्भ प्रमुख प्रा.ज्ञानदेव मानवतकर, वंजारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम केंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर,लोणार बँकेचे कार्यकारी संचालक शिवप्रसाद सारडा,पंचायत समिती सदस्या हर्षदाताई डव्हळे, मनसेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिसे, संचालक हनुमान इंगळे,सुधाकर राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समाधान पोफळे, जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम जाधव,आयोजक शंकरराव मानवतकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव फुके यांनी केले.
 पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मान्यवरांची व श्रोत्यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर गिलवरकर, संचलन अश्रू फुके तर आभार आयोजक शंकर मानवतकर यांनी मानले.ज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. संतोष टारपे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र महामुनी,गुरुवर्य डी.एम.राठोड यांच्यासह पत्रकार, लेखक, साहित्यिक, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...