शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख करून अपमान करणाऱ्या ESIC कामगार राज्य विमा निगम च्या वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करा अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने मागणी.

औरंगाबाद (ब्युरो चीफ) :- अवघ्या राष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन 2020 च्या दिनदर्शिकेत एकेरी उल्लेख करून केंद्र
 सरकारच्या अखत्यारीत असलेल्या E S I C ने अकलेचे तारे तोडले आहेत,हाच का यांचा छत्रपतींचा आशीर्वाद ?महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी  या कमेटीवर सदस्य असतांना ही जखमेवर मीठ चोळणारी चूक होतीच कशी, हे महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी काय मीटिंग ला फक्त चहा बिस्कीट खाण्या साठी जातात का ?असा सवाल आज क्रांतिसैनिकांनी ESIC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याना विचारून चिकलठाणा व वाळूज कार्यालयात प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या नेतृत्वखाली ठिय्या आंदोलन केले,यावेळी पोलीस आयुक्त श्री चिरंजीवी प्रसाद यांना भेटून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.दवाखान्यांमध्ये आमच्या कामगार बंधूंचे काय हाल होतात हे जगजाहीर आहे,दवाखान्याची काय दुरावस्था आहे हे कोणालाही वेगळे सांगायला नको,आणि हे सगळे असताना ,देशाच्या अस्मितेशी ही सरळ सरळ खेळत आहे,या दिनदर्शिकेचे वितरण त्वरित थांबावे ,महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी माफी मागून ,नवीन दिनदर्शिका शिवजयंती पूर्वी छापाव्यात,प्रकाशक,वितरक,मुद्रक यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने करण्यात आलीआजच्या आंदोलनामध्ये प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, दिनेश दुधाट वाळूज महा अध्यक्ष,मनोहर निकम शहर जिल्हा अध्यक्ष,औदुंबर देवडकर वाळूज युवा अध्यक्ष,भारत फुलारे डावात मचाळा पार्टी, दीपक गायकवाड वाळूज उपाध्यक्ष,राजू शेरे जिल्हा संघटक,संजय कोकाटे मार्गदर्शक,विजय राजगुरू,शरद कदम,गणेश गवली, निलेश जाधव ,राहुल सुरडकर,राहुल अग्रवाल,इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...