शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

  अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची धुळीच्या    साम्राज्याने अवहेलना
                   अनाधिकृत असल्याच्या कारणावरून 
    महाराजांच्या पुतळा साफसफाईला कायद्याची आडकाठी

अंबड / (प्रतिनिधि): स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराला करंगळी कापून रक्ताभिषेक केला मावळ्यासोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष सुरू केला तो स्वकीय आणि परकियांसोबत.
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य प्रेरणादायी असुन त्याचे प्रतिक म्हणून संबध देशभर छत्रपती शिवरायांचे अनेक ठिकाणी पुतळे उभे केलेले आहेत.मात्र याच पुतळ्यांचा राजकारणासाठी उपयोग होवु लागल्याने छत्रपती शिवरायांच्या कार्याची अज्ञातपणे अवहेलना सुरू झाल्याचा सुर शिवप्रेमी लोकांतुन समोर येत आहे.अंबड शहरातील पाचोड नाका म्हणजेच शहरात प्रवेश होणाऱ्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्याची जागा होती तिथे अंबड नगर परिषदेने चौथारा निर्माण केला होता आणि याच चौथ-यावर विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी दि.12 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला.पुतळा उभा करण्यास कोणतीही परवानगी नसल्याच्या कारणावरून आ.कुचे यांचेसह 43 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना अंबड पोलीसांनी अटक केली होती.(विनापरवानगी पुतळा उभारल्या प्रकरणी आ. नारायण कुचे यांच्यासह ४४ जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात कलम
१४३,१४९,१४७,४४७ तसेच महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्य भंग प्रतिबंध कलम ११ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत)
छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करुन मत मिळवणे हाच काय तो एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मध्यरात्रीच्या अंधारात पुतळा उभा केला मात्र त्या पुतळ्याची अद्यापपर्यंत विधीवत पुजा आणि मानसन्मान अजुनही झाला नाही.अटकेतुन बाहेर आल्यानंतर सर्व 44 लोकांचा ठिकठिकाणी सत्कार झाले, सुटकेचा आनंद ही मोठमोठ्या तोफा वाजवून पुष्पहार आणि मिठाईने साजरा केला गेला.छत्रपतीचा पुतळा बसवल्यामुळे मतदार संघातील गावागावात सत्कार सोहळे झाले.
पुतळ्यामुळे आ.कुचे हे पुन्हा एकदा विधानसभेत पोहचले
मात्र छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित साफ सफाई होईना त्यात रस्ता कामामुळे पुतळ्यावर धुळ माती बसल्याने एक प्रकारची अवहेलना सुरू झाली.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थान ची अस्मिता असतांना त्यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी कायद्याची आडकाठी आल्याने समस्त अंबडकरांतुन संताप व्यक्त केला जात आहे छत्रपती शिवरायांची जयंती काही दिवसांवर येवून ठेपली असुन अंबडचा पुतळा धुळीच्या थराने विद्रुप होत आहे.
बसवलेल्या पुतळ्याची नियमित साफ सफाई झाल्यास आणि त्यावर पाणी पडल्यास तो लवकर खराब होईल या भितीने पुतळ्याची साफसफाई होत नाही अशीही चर्चा दबक्या आवाजात येत असुन पोलीस निरीक्षक अंबड यांनी पुतळ्याबद्दलची खरी माहिती द्यावी अशी सर्वसामान्याकडुन अपेक्षा व्यक्त होत आहे.चार दिवसावर छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा येवून ठेपला असुन पुतळ्याच्या रंगरंगोटी तसेच स्वच्छता व विधीवत पुजेकरिता कोणताही निर्णय प्रशासनाकडून न झाल्याने मोठा संताप व्यक्त केल्या जात आहे पुतळा बसवुन पाच महिने झाले मात्र त्या पुतळ्याची विधीवत पुजा कायद्याच्या आडकाठी मुळे करता येवु नये हे अंबडकरांचे दुर्देव आहे. ज्यांनी पुतळा बसवण्यासाठी “रात्रीचा खेळ” केला त्यांनी किमान पुतळ्याच्या मान्यतेसाठी प्रशासकीय पाठपुरावा करावा.जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मत्स्योदरी देवी मंदिरासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सूर्योदयानंतर एकाच दिवशी हजारो लोकांच्या साक्षीने तो पुतळा बसवला होता पुतळा बसवण्यापुर्वीच शासनाकडून सर्व मान्यता मिळवल्या होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा मंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते विधीवत पुजे सह स्थापन झाला होता पुढे शिवसेनेचे तत्कालीन आमदार संतोष सांबरे यांनी आपल्या आमदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधी देवुन पुतळ्याची दगडी भिंत बांधलेली आहे तर मत्स्योदरी देवस्थान नियमितपणे या पुतळ्याची देखभाल आणि साफसफाई करीत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...