शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाज क्रांती मोर्चा
     सकल मातंग क्रांती मोर्चा मध्ये उलटला अथांग जनसागर

औरंगाबाद (ब्युरो चीफ) :- औरंगाबाद येथे झालेल्या सकल मातंग क्रांती मोर्चा मध्ये उलटला अथांग जनसागर महाराष्ट्रात गेली दोन-ते तीन वर्षापासून सातत्याने मातंग समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि मातंग समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या गेली कित्येक वर्षापासून शासनदरबारी प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी काल दि १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयांवर मातंग समाजाचा सकल मातंग क्रांती मोर्चा धडकला
या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातुन विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांसहित पदाधिकारी, कार्यकर्ते समाजबांधव आणि माता-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जिकडे-तिकडे मोर्चेकरांच्या हातातील पिवळे झेंडे आणि महापुरुषांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणानून गेले होते उन्हाची परवा न करता तरुणांबरोबरच लहान लेकरांसहित वृद्ध लोकांनी या मोर्चा मध्ये मी आणि माझा समाज म्हणून सहभाग नोंदवला होता.
         क्रांती चौक येथून निघालेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालय याठिकाणी करण्यात आला येथे उपस्थित जनसमुदायाला प्रमुख नेत्यांनी संबोधित केले यांवेळी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील, लहुजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे, क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे उत्तमरावजी कांबळे, समाजाचे नेते संजय ठोकळ, ज्यांच्या पुढाकाराने हा मोर्चा यशस्वी रीतीने संपन्न झाला ते वीर योद्धा लाल्या मांग यांचे नातू प्रभुभाऊ बागुल, अजिंक्य चांदणे, शिर्डी येथील विराट प्रतिष्ठान चे प्रदीप सरोदे, लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन, डॉ.शेषराव नाडे, विनोद साबळे, राजु आहिरे, कमलेश चांदणे, कबीरानंद बबनरावजी दाभाडे, राजु खाजेकर आदींनी भाषणे केली यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मा.विभागीय आयुक्त यांना अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे आणि मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले यांवेळी निवेदन देतांना संजय ठोकळ, प्रभुभाऊ बागुल, विनोद साबळे, अजिंक्य चांदणे, प्रदीप सरोदे, संदिप मानकर, डॉ.शेषराव नाडे, डॉ.सचिन साबळे, संदिप चांदणे, सुवर्णा साबळे, राजश्री साठे, ज्योती जाधव आदींची उपस्थिती होती....!!
            ------------------------------- ● ● ----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...