शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

   कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.                                                                          डॉ.कासलीवाल

जालना (प्रतिनिधी) :- तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थ च्या सेवनाने युवा पिढी कॅन्सर च्या आहारी जात आहे मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी कोटपा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ आकाश कासलीवाल यांनी केले आहे.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद क्रांतीसिंह बहुद्देशीय सेवाभावी संस्था,दरेगाव व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कोटपा कायद्याची अंमलबजावणी यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी पावरपाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कोटपा कायद्याच्या विविध कलमाची माहिती देण्यात आली यावेळी जालना पोलीस अधीक्षक एस चैतन्य, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर क्रांतिसिंह बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ संदीप गोरे कार्यक्रम अधिकारी रंगनाथ जोशी गजानन गाडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...