गुरुवार, २६ मार्च, २०२०

पोलिस जमादार बाप सोबत असताना आरोग्य सहाय्यीकेला पोलिसांकडून बेदम मारहाण.

हिंगोली.  :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. बुधवारी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सहाय्यीका म्हणून कर्तव्य पार पाडून वडील पोलिस जमादार यांच्यासोबत घराकडे जात असताना नांदेड नाक्यावर या दोघांचे काही ऐकून घेण्यापूर्वीच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रियंका राठोड ह्या आरोग्य सहाय्यीका म्हणून काम करतात. मस्तानशहा नगर येथे कोरोना बाबत सर्वेक्षण करून गोरेगाव ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेले वडील पोलिस जमादार साहेबराव राठोड यांच्यासोबत बांगर नगरला आपल्या घरी जात असतात, नांदेड नाका येथे संचारबंदी कामी बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी त्या दोघांचे म्हणणे ऐकून न घेता, ओळखपत्र न पाहता, आम्ही आरोग्य कर्मचारी आहोत, वडील पोलिस जमादार आहेत हे सांगूनही मारहाण केली, असा आरोप आरोग्य सहाय्यीका प्रियांका राठोड यांनी केला आहे.
त्यांच्यावर हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला चार टाके पडले आहेत. विशेष म्हणजे संबंधित आरोग्य कर्मचारी ह्या कॅन्सर पीडित असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिले आहे.
समाजासाठी काम करून मारहाण – पीडित महिला कर्मचारी
मी कोरोना बाबत मस्तानशाहा नगर येथून सर्वे करून वडिलांसोबत घरी जात असताना नांदेड नाका येथे मला मारहान 
करण्यात आली. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय ? पोलिसांकडून अशाप्रकारे अन्याय होत असेल तर आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी काम थांबू.

माझ्या मुलीला जनावरासारखा मारलं – वडील साहेबराव राठोड ( पोलीस जमादार)
मी गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका येथे 
 जिल्हा सीमा बंदीचा बंदोबस्त करू हिंगोली येथे शुगर च्या गोळ्या  घेण्यासाठी आलो होतो. आरोग्य सेवेत असलेल्या माझ्या मुलींने मला फोन केल्यामुळे तिला घेऊन घरी जाताना असतांना नांदेड नाका येथे आमचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वी पुंडगे मॅडम यांनी माझ्यामुलीला बेदम मारहाण केली जनावराला एवढे मारत नाहीत. परत त्यांनीच माझ्या मुलीचा अपघात झाला म्हणून आरोग्य अधिकाऱ्याला माहिती दिली आहे.
चक्कर आली म्हणून दवाखान्यात नेले – सपोनि पुंडगे
चक्कर आली म्हणून दवाखान्यात नेले – सपोनि पुंडगे
माझ्या सह अन्य पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर वर होते. त्या दोघांना विचारपूस करण्यासाठी गेला असता संबंधित महिला चक्कर आल्याने खाली पडली त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला त्यानंतर आम्ही तिला घेऊन हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. संबंधित आरोग्य कर्मचारी महिलेला कोणतीही मारहाण केली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...