गुरुवार, २६ मार्च, २०२०


 पोलिस उपविभागीय अधिकारी (डी. वाय. एस.पी ) मा.खिरडकर              साहेब यांच्या वतीने जालना नागरीकांस अवाहन.
जालना/प्रतिनिधी:- जगभरात कोरोना संसर्गानं 
 थैमान घातलं आहे. मागील 22 तारखेपासून आपण जे पोलिस प्रशासनाला सहकार्य करत आहात त्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मा.पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. जिल्हा अधिकारी,मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन केलेले आहे की, 21 दिवसांचे संपूर्ण देशामध्ये लाॕक डाऊन झालेले आहे. परंतु नागरिकांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन आहे की आपल्याला अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा कारण अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यासाठी कोणीही विनाकारण दुकानांच्या समोर गर्दी करू नये. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क लावुनच बाहेर पडावे.तसेच किराणा दुकानदार, भाजीविक्रेते,मेडिकल स्टोअर्स इत्यादींनी सुद्धा स्वतः मास्क लावावे व नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सेवा पुरवावी. नागरिकांनी गरज नसताना शहराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.स्वतःची काळजी,परिवाराची काळजी,पर्यायाने शहराची,राज्याची व देशाची काळजी करावी.कुणाला जर सर्दी,ताप,खोकला सारखा त्रास जाणवत असेल तर त्यांनी सामान्य रुग्णालयात उपचार घ्यावे. तसेच पोलीस प्रशासनाकडून वारंवार आपणांस सुचना देण्यात येत आहेत,त्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा,नाहीतर आपण आपल्या घरातच राहावे.जेणेकरून आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही,तसेच पोलिसांवर ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. वरील सर्व गोष्टीचे आपण काटेकोरपणाने पालन करावे व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलिस विभागीय अधिकारी (डी. वाय. एस.पी ) मा. खिरडकर साहेब यांच्या वतीने जालना नागरीकांस आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...