गुरुवार, २६ मार्च, २०२०


पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये कोरोना मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे   -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन
          जालना प्रतिनिधी:-जिल्ह्यामध्ये दि. 23 मार्च 2020 पासुन फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144  अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये 5 पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमु नये, अथवा कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली आदी ठिकाणी थांबु नये.  शक्यतो घरीच थांबावे, अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.जिल्ह्यातील किराणा मालाच्या दुकाना पुर्णवेळ सुरु राहतील. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्याची काहीही आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तु जसे फळे, भाजीपाला, दुध, अंडी, मांस इ. च्या दुकाने व  आस्थापना नेहमीप्रमाणे सुरु असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आवश्यक बाबी विनाकारण गरजेपेक्षा जास्त खरेदी करु नये अथवा त्याचा साठा करुन ठेवू नये, जेणे करुन जीवनाश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होणार नाही. शासकीय कर्मचारी  नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग आपल्या सोबत असुन कारोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिला आहे.
जनतेला कोणत्याही प्रकारच्या शंका अथवा काही विचारणा करावयाची असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे 02482-223132 या क्रमांकावर फोन करावा.  मागील एक महिन्यात, आपण जर कोरोनाग्रस्त देशातुन आलेला असाल किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात आला असला तर http://ezee.app/covid19jalna या लिंकवर जाऊन आपली संपुर्णपणे खरी माहिती भरावी. जेणेकरुन आपल्याला योग्य ती मदत करु शकु.
जालना जिल्ह्यामध्ये दि. 26 मार्च 2020 रोजी 1 रुग्ण नव्याने दाखल झाला आहे. आतापर्यंत एकुण 60 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 58 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 52 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत व त्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रोजी 7 रुग्ण  विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 104 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 97 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 212 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात  आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण 15 संस्था अलगीकरणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...