गुरुवार, २६ मार्च, २०२०

संचारबंदी लागू केलेली असतांना काही कारण नसताना विनाकारण रस्त्यावर, अंबड पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल.
         पहिला लाठीचा प्रसाद मग नागरिकांचा प्रतिसाद
अंबड़/प्रतिनिधि : अरविंद शिरगोळे :कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने देशभरात संचारबंदी
लागू केलेली असतांना काही एक कारण नसताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना चांगलेच महागात पडले असून पाच जणांविरुद्ध अंबड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई आज दि.26 मार्च रोजी सकाळी 09.45 ते 11.30 वाजेच्या दरम्यान करण्यात आलेली आहे.
सध्या कोरोना विषाणू संदर्भात संपूर्ण देशासह महाराष्ट्र मध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासन आपल्या परीने योग्य ते निर्णय घेत आहे. त्यातच जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश देखील संपूर्ण जालना जिल्हयाला देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. मात्र अंबड शहरातील काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी आपल्या फौजफाट्यासह शहरांमध्ये पाई पेट्रोलिंग करत असताना त्यांना काहीएक कारण नसताना विनाकारण रस्त्यावर फिरणारे बापू गोरख शिंदे वय 27 वर्ष रा.हस्तपोखरी हा सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास इंदिरानगर अंबड येथे फिरताना मिळुन आल्याने त्यास पकडण्यात आले. त्यानंतर हबीब मोहल्ला अंबड येथे शेख समीर शेख नजीर या.अरब मोहल्ला अंबड यास 10.15 वाजेच्या सुमारास पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा ताफा हा 11.30 वाजेच्या सुमारास नगर परिषद अंबड समोर पोहोचला असतात तेथे मालिकसिंग तेजसिंग लोधी वय 49 वर्ष, आशिष नामदेव रामगोपाल दोन्ही रा.कंजई ता.गोटेगाव जि.नसिंहपुर राज्य मध्यप्रदेश व बोलाराम प्रताप राठोड वय 38 वर्ष रा.सोनकपिंपळगांव ता.अंबड हे काही कारण नसताना विनाकारण फिरतांना मिळून आल्याने त्या तिघांना ही पकडण्यात आले आहे. वरिल पाचही जणांना पोलीस ठाणे अंबड येथे नेण्यात आले व त्यांच्याविरुद्ध कलम 188,34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...