रविवार, २६ एप्रिल, २०२०

शहरातील 25 हजार पेक्षा अधिक कुटूंबापर्यंत धान्य पुरवठा करून           गोरंट्याल दाम्पत्याने जोपासली सामाजिक बांधीलकी
धान्याची गरज असलेल्या कुटूंबांसाठी मोबाईल पथक नियुक्त; गरजुंनी संपर्क साधल्यास पथक करणार मदत -- आ. कैलास गोरंट्याल

जालना,(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जालना शहरातील 25 हजार पेक्षा अधिक गोर-गरीब आणि गरजु कुटूंबापर्यंत अन्न धान्याच्या माध्यमातून मदतीचा हात देत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी गोरंट्याल परिवाराच्या सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासण्याची परंपरा कायम राखली आहे. दरम्यान अन्नधान्या संदर्भात गरजु कुटूंबापर्यंत मदत पोहचविण्यासाठी आमदार गोरंट्याल यांनी मोबाईल पथक नियुक्त केले असून या पथकातील सदस्य गरजु कुटूंबांना धान्यासह शिजवलेले अन्न पोहचवून त्यांची भुक भागविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरात कोरोना या संसंर्गजन्य आजाराने गेल्या दोन महिण्यापासून थैमान घातले असून या पार्श्‍वभुमीवर प्रथम राज्यशासनाने राज्यात 24 ते 31 मार्च या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यशासनाच्या या निर्णया पाठोपाठ केंद्र शासनाने देखील दि. 25 मार्च पासून देशभरात लॉकडाऊनचे आदेश दिलेले असून या आदेशात पुढे वाढ करून दि. 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम ठेवले आहे. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपला आणि कुटूंबीयांचा उदरनिर्वाह भागवणार्‍या कामगारांसह मजुरांची मोठी कुचंबना झाली असून काम नसल्यामुळे रोजंदारी बुडत असतांना दुसरीकडे अन्नधान्याचा देखील प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे जालना शहरातील हजारो कुटूंब आणि या कुटूंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली होती. कै. किसनराव गोरंट्याल यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल या दाम्पत्याने गोरंट्याल परिवाराच्या सामाजिक कार्याची ही परंपरा लॉकडाऊन कालावधीत कायम राखत जालना शहरातील गोर-गरीब व गरजु असलेल्या 25 हजार पेक्षा अधिक कुटूंबांना अन्नधान्यासह शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा करून संकटकाळी मदतीचा हात पुढे केला आहे. दि. 09 एप्रिल रोजी आ. कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस असल्याने सर्व कार्यक्रमांना फाटा देत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आ. गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी शहरातील गरजु कुटूंबापर्यंत जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. जालना शहर व जिल्हा काँग्रेस तर्फे जालना शहरातील गरजु कुटूंबांना पुरीभाजी, पुलाव आदी शिजवलेले अन्न पुरवुन त्यांची भुक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय जालना नगर पालिकेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज साफ-सफाईच्या कामासाठी कार्यरत असल्यामुळे या कार्याची दखल घेवून गोरंट्याल परिवाराच्या वतीने सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना दररोज नाष्टा पुरविण्याचे काम केले जात आहे. शहरातील गरजु कुटूंबांची धान्याची गरज लक्षात घेवून आ. गोरंट्याल यांनी एक मोबाईल पथक नियुक्त केले असून शहरातील कोणत्याही भागातून आ. गोरंट्याल यांना अन्नधान्याबाबत मागणी झाल्यास या मोबाईल पथकातील सदस्यांच्या माध्यमातून गरजु कुटूंबापर्यंत धान्य पुरवठा करून त्यांची अडचण दुर करण्याचा प्रयत्न प्राधान्य क्रमाने केली जात आहे.शहरातील ज्या भागातील गरजु कुटूंबांना अन्नधान्याची अडचण असेल अशा कुटूंबातील सदस्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी मांडल्यास या बाबत निश्‍चीतपणे दखल घेवून गरजवंतापर्यंत धान्य पुरवठा करण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी दिली आहे.
आजपासून कै. भुदेवी गोरंट्याल अन्नछत्रास प्रारंभ
जालना शहरातील सामाजिक चळवळीत आपले वडील कै. किसनराव गोरंट्याल आणि मातोश्री कै. भुदेवी गोरंट्याल यांनी सातत्याने सहभाग नोंदवून अडचणीच्या काळात गोर-गरीब कुटूंबीयांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा गोरंट्याल परिवाराने अखंडपणे सुरूच ठेवला असून कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभुमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जालना शहरातील हजारो कुटूंब आणि या कुटूंबातील सदस्यांना अन्नधान्यासह शिजविलेल्या अन्नाचा पुरवठा करण्यासाठी गोरंट्याल दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. गरीब लोकांची भुक भागविण्यासाठी मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्रास उद्या दि. 27 एप्रिल सोमवार पासून शहरात प्रारंभ करण्यात येत असून या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज किमान 2500 हजार लोकांपर्यंत शिजविलेले अन्न पुरविण्यात येणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली आहे. चपाती-भाजी, पुरी-भाजी, पुलाव अशा पद्धतीने दररोज वेगवेगळे शिजविलेले अन्न पुरवून गरजु लोकांच्या पोटाची भुक भागविण्याचा प्रयत्न सर्व नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...