बुधवार, १ एप्रिल, २०२०

             आरोग्य दुत यांच्याकडून जनजागृती
जालना (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत असून प्रत्येक गाव
१००% लोकडाऊन करण्यात येत आहे,याच पारश्वभूमीवर दरेगाव,रामनगर,जळगाव, ममदाबाद,मनेगाव, निरखेडा तांडा या ठिकाणी क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आरोग्य दुत यांची नेमणूक करण्यात आली असून हे गावात लोकांमध्ये कोरोना विषाणू विषयी जनजागृती करत आहेत.
     कार्यात गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जनजागृतीच्या या कामात बचत गटाच्या महिला मागे नाहीत.
आरोग्य दुत व गावातील तरुण मंडळी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावात जनजागृती करून गाव १००% बंद करत आहे कोणीही रस्त्यावर किंवा गावात फिरताना दिसत नाही यामध्ये स्टिकर,बॅनर,व दवंडी याचा वापर करून गावात जनजागृती करण्यात येत आहे तसेच गरीब कुटुंबाला मदत करत आहे. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष विष्णु
 पिवळ, आरोग्य दुत उषा शिंदे, गजानन गाढे,भागवत वराडे, सुनीता जाधव, अदी कार्य करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...