बुधवार, १ एप्रिल, २०२०

        गोरगरीबांना हक्काचे तीन महिन्याचे राशन सुरक्षीत                        ठेवून,आपातकालीन मोफत अन्नधान्य वाटप करावे.
ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॕन्ड एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांचे शासनास निवेदन.
जालना, प्रतिनिधी :- कोरोना विषाणुच्या
पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लाॕक डाऊन असल्या मुळे रोजंदारीवर मजूरी करणारे मजूर,कामगार,छोटा व्यवसाय करून पोट भरणारे,तसेच भटकंती करून ऊदरनिर्वाह करणारे यांच्या रोजीरोटीचा फार बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थीतीमध्ये सर्वांना राज्यशासनाकडून अन्नधान्यामध्ये आपत्ती काळातील विशेष पॕकेज देण्यासंबंधीची मागणी ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॕन्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील विशिष्ट
आपातकालीन परिस्थिती विचारात घेता, लक्षनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यानां तीन महीन्यांचे धान्य एकत्रीतपणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, म्हणजे एप्रिल,मे व जून २०२० या तीन महिण्याचे अन्न धान्य वितरीत करण्याचा आदेश व निर्णय राज्य शासन घेतला आहे.आपातकालीन परिस्थीतीत घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे.परंतू आज लॉकडाऊन मुळे लाखो
मजूर,कामगार,रोजदारीने काम करणारे लोक आणि मध्यमवर्गीय कुटुंब सुध्दा आर्थिक अडचणीत अडकलेले आहेत.
अशा लोकांवर भूकमरीची वेळ आलेली आहे.
 आपण एप्रिल,मे व जुन महीन्याचा आगोदर धान्य देऊन आपातकालीन परिस्थीत त्यांना संभाळत आहे. त्यांच्याच शिधा कोठ्यातून आगोदर धान्य देत आहेत. परंतू में, व जून महिन्यात त्या लोकांना
पुन्हा उपासमारी व भुकमरीची वेळ येईल, कारण की त्यांच्या आगोदर महिण्याचे शिल्लक धान्य आपातकालीन परिस्थीत वाटप करुन शासन त्यांच्या हिश्शाचे आहे तेच वाटप करीत आहे.
म्हणून एप्रिल,मे जुन २०२० चा साठा देण्या एवजी,त्याःचा साठा सुरक्षित ठेवून आपातकालीन धान्य गोरगरीबानां जिल्हा अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांच्या देखरेखीत मोफत वाटप करावे,झोपड्पट्टी भागात व गोरगरीब लोकांकडे
अजूनही शिधा पत्रक नाहीं, ऑनलाइन दुरुस्त्या झालेले नहीं, या परिस्थीत खुलेपणे आपातकालीन धान्य राज्याच्या गोरगरीब जनतेला वाटप करण्यात यावे.म्हणजे पुढील मे व जुन महिन्यात त्या लोकांना त्यांचे हक्काचे धान्य
सुरक्षित राहीन.
  ह्युमन चाईल्ड वेलफेअर अँन्ड एज्युकेशन सोसायटी,जालना चे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांच्या वतीने राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांना अश्या आशयाचे एक निवेदन पर पत्र पाठविण्यात आले. त्यांच्या ह्या निवेदनाची मा.राज्यमंत्री छगन भुजबळ साहेबांनी दखल घेतली तर राज्यातील गोरगरीब जनतेला नक्कीच फार मोठा आधार मिळणार आहे.म्हणून सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...