सोमवार, ६ एप्रिल, २०२०


जालना जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत एक रुग्ण दाखल
नागरिकांनी घाबरुन न जाता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. -जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन
जालना,प्रतिनिधी: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात जालना जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा 
सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा (कोविड-19) एक बाधीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय,  येथे  दाखल करण्यात आले असुन त्यावर उपचार सुरु आहेत.कोरोना बाधीत रुग्ण ही महिला असुन त्यांचे वय 65 वर्ष आहे. या रुग्णांस दि. 5 एप्रिल, 2020 रोजी  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या रुग्णाचा स्वब घेऊन तो पुणे  येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता तो पॉझिटिव्ह आला आहे.  या रुंगणाच्या संपर्कातील कुटुंबातील व्यक्तींनाही तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असून रुग्ण रहात असलेला संपूर्ण परिसर लॉकडाउन करण्यात  येऊन या परिसरातील व्यक्तीची आरोग्य विभागाच्या 50 टीममार्फत तपासणी करण्यात येणार आहे.  नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच राहावे. प्रत्येकाने वयक्तिक स्वच्छता पाळत वारंवार साबणाने हात धुवावेत. सॅनिटायझर चा वापर करावा. सोशियल डिस्टन्स बाबत प्रशासनाकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...